यूएईचे अध्यक्ष शेख खलिफांचे निधन

यूएईचे अध्यक्ष शेख खलिफांचे निधन

संयुक्त अरब अमिराती म्हणजे यूएईचे अध्यक्ष शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान यांचे शुक्रवार, १३ मे रोजी ७३ व्या वर्षी निधन झाले. झाएद अल नाहायन यांच्या निधनाबद्दल सरकारने ४० दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. याशिवाय देशातील सर्व झेंडे अर्ध्यावर उतरवून खासगी आणि सरकारी क्षेत्रात तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या मृत्यूचे कारण अजून समोर आलेले नाही.

शेख खलिफा यांनी नोव्हेंबर २००४ मध्ये युएईचे दुसरे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आणि फेडरेशनच्या सात अमिरातीपैकी सर्वात श्रीमंत असलेल्या अबू धाबीचे सोळावे शासक म्हणून त्यांच्या वडिलांच्या उत्तरार्धात पदभार स्वीकारला होता. २०१४ मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती, त्यांनतर ते क्वचितच सार्वजिक ठिकाणी दिसले होते. २०१४ नंतर ते फक्त निर्णय देत होते.

हे ही वाचा:

मलिकांना जामीन नाहीच; पण खासगी रुग्णालयात उपचारांची परवानगी

‘सत्तेसाठी ठाकरे सरकारने हिंदुत्व गहाण ठेवले’

कराची बाजारपेठेत स्फोट; तीन ठार

एनआयएच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी अतुलचंद्र कुलकर्णींची नियुक्ती

२००४ च्या आधी खलिफांचे वडील शेख झायेद बिन सुलतान अल नाहयान राष्ट्राध्यक्ष होते. १९७१ ते नोव्हेंबर २००४ पर्यंत ते देशाचे प्रमुख होते. त्यांनतर शेख खलिफा हे युएईचे दुसरे अध्यक्ष बनले. त्यांच्या कार्यकाळात शेख खलिफा यांनी युएईची आणि अबूधाबीच्या प्रशासनाची पुनर्रचना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि अनेक सुधारणा अंमलात आणल्या आहेत.

दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, शेख खलिफा य हे एक महान राजकारणी आणि दूरदर्शी नेते होते, ज्यांच्या नेतृत्वाखाली भारत-यूएई संबंध वाढले आहेत.

Exit mobile version