दोन महिला मॅनहोलमध्ये पडल्या; पालिकेचे दावे पडले उघडे

दोन महिला मॅनहोलमध्ये पडल्या; पालिकेचे दावे पडले उघडे

दरवर्षी पावसाच्या सुरुवातीला मुंबई महापालिका नालेसफाई झाल्याचे पोकळ दावे करते. यंदाही तसेच दावे महापालिकेने अगदी छातीठोकपणे केले. कालच्या पहिल्या पावसात मुंबई पुन्हा एकदा तुंबली आणि पहिल्या पावसाच्या पाण्यातच पालिकेचे दावेही वाहून गेले. पावसाचे पाणी तुंबल्यावर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित राहतो तो म्हणजे उघड्या मॅनहोलचा. नुकतीच काल भांडुप व्हिलेजमधील एक धक्कादायक घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आली. दोन महिला उघड्या मॅनहोलमध्ये पडल्या. नशीब बलवत्तर म्हणून या महिला वाचल्या. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी घडलेल्या घटनेसंदर्भात तीव्र संताप व्यक्त केलेला आहे.

हे ही वाचा:

‘कुत्रा इमानी असतो, तो भामट्यांवरच भुंकतो’

येत्या निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील

चिनी लि निंगला ठेंगा; ऑलिम्पिकपटूंच्या पोशाखावर फक्त ‘इंडिया’

११,६१७ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंदच नाही

काल घडलेल्या प्रकारामध्ये या दोन महिलांचा जीव थोडक्यात बचावला. असे असले तरी एकूणच प्रशासनाचा ढिसाळ कारभारच या सर्व गोष्टीला जबाबदार आहे. ‘केवळ टक्केवारी हाच धंदा माहीत असलेल्या पालिकेचा कारभार मुंबईकरांसाठी जीवघेणा ठरतोय. पावसाच्या तुंबलेल्या पाण्यात तकलादू झडप असलेल्या मॅनहोलमध्ये पडून केवळ नशिबाने वाचलेल्या दोन महिलांचा हा व्हिडिओ पाहा. तुमचा संताप अनावर होईल. मुंबईकरांच्या जीवाशी खेळ चालू आहे,’ अशी टिप्पणी आमदार भातखळकर यांनी केली आहे.

मुंबईतील मॅनहोल हे पावसामुळे तुंबलेल्या पाण्यात उघडे राहतात आणि त्यामुळे अनेकांनी याआधीही जीव गमावला आहे. २०१७ मध्ये मुंबईतील डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचाही जीव याच मॅनहोलमुळे गेला होता. त्यांचा मृतदेह समुद्रात सापडला होता.

दरवर्षी करोडोंचा खर्च करून महापालिका नालेसफाईचे दावे करते. या पोकळ दाव्यांमुळे अनेकांना मात्र जीव मुठीत घेऊन राहावे लागते. उघडे मॅनहोल हे मृत्यूचे सापळेच आहेत. आपल्याच कराच्या पैशांवर महापालिका देशातील नंबर एकची महापालिका मानली जाते, पण प्रशासनातील भोंगळपणा वारंवार समोर येत असतो.

Exit mobile version