33 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरराजकारणअडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाप्रमाणेच ऑलिम्पिक संघटनेत दोन-दोन वर्षे खजिनदार

अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाप्रमाणेच ऑलिम्पिक संघटनेत दोन-दोन वर्षे खजिनदार

Google News Follow

Related

मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षे विभागून घेतले जाते, अगदी त्याप्रमाणेच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेत (एमओए) खजिनदार पद दोन-दोन वर्षे विभागून देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला.

एमओएच्या घटनेत तशी तरतूद नसली तरी घटनेच्या बाहेर जाऊन ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या उद्देशाने नुकत्याच झालेल्या एमओएच्या निवडणुकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार पहिली दोन वर्षे ज्युडो संघटनेचे धनंजय भोसले हे खजिनदार असतील आणि दोन वर्षांनी त्यांनी राजीनामा दिल्यावर खोखो संघटनेचे चंद्रजीत जाधव यांच्याकडे खजिन्याच्या चाव्या दिल्या जातील. त्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.

या निवडणुकीत बाकी सर्व पदांसाठी बिनविरोध निवडणूक पार पडली. पण खजिनदार पदासाठी भोसले आणि जाधव यांनी अर्ज केल्यामुळे तिथे निवडणूक होणार हे निश्चित होते. पण शेवटी तंटामुक्त निवडणुकांच्या उद्देशाने तडजोड करण्यात आली आणि दोघांना २-२ वर्षे खजिनदार होण्याची संधी देण्यात आली. यामुळे ऑलिम्पिक संघटनेत नव्या पर्वाला प्रारंभ झाला आहे. आता यापुढील निवडणुकांत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव अशा पदांसाठीही २-२ वर्षे विभागून पद देता येईल अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. तसेच घटनेत नसलेल्या गोष्टीही आपण करू शकत असल्यामुळे संघटनेच्या घटनेचा केला जाणारा बाऊ यापुढे होणार नाही, अशीही शक्यता व्यक्त होत आहे.

निवडणुकीसाठी होणारे मतदान, छाननी, उमेदवारांचा अर्ज वगैरे सगळ्या औपचारिकतेलाही पुढे फाटा दिला जाऊन निवडणूक प्रक्रिया अधिक सोपी होईल, असाही दावा केला जात आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रासह कोल्हापूर उपउपांत्यपूर्व फेरीत

मोदी म्हणाले, भारतातील ‘बायडन’चे पुरावे मी सोबत आणले आहेत!

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत शुभम कुमार अव्वल

गडकरी म्हणाले, येत्या ३-४ महिन्यांत इथेनॉलची इंजिन सक्तीचे

शिवाय, शक्य झाल्यास एकेक वर्षही प्रत्येकाला संधी देऊन संघटनेत येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकालाच कामाची जबाबदारी सोपविण्याचा पर्यायही खुला होणार आहे. एकूणच या सगळ्या खेळीमेळीच्या वातावरणामुळे महाराष्ट्रात ऑलिम्पिक चळवळ जोर धरणार असल्याचेही बोलले जाऊ लागले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा