पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरमध्ये निवडणुकीसंदर्भात एका रॅलीला संबोधित करणार आहेत. दरम्यान, पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वीच मणिपूरमधील कांगपोकपी जवळच्या परिसरातून आयईडीसह दोन दहशदवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
मणिपूरमध्ये २८ फेब्रुवारी आणि ५ मार्चला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यात व्हीव्हीआयपी हालचाल सुरु आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवणुकीसाठी राज्यात व्हीव्हीआयपी हालचाल सुरु असताना दहशदवादी हल्ला करण्याचा कट रचला जात होता. इंफाळ ते कांगपोकपी या मार्गावर व्हीव्हीआयपी ताफ्याला स्फोट घडवून आणण्याचा कट होता. त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांचा हा कट उधळून लावला आहे.
अटक करण्यात आलेले दोन्ही दहशतवादी नॅशनल सोशालिस्ट ऑफ नागालँड संघटनेशी संबंधित आहेत. या दहशतवाद्यांनी कोणाला लक्ष्य करण्याचा कट रचला होता, याची चौकशी पोलिस करत आहेत. या दोघांना पकडून सेकमाई पोलिस ठाण्यात आणले असता, त्यांच्या समर्थकांनी रात्री पोलिस ठाण्यावर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि अश्रूधुराचा मारा केला.
मणिपूरमधील ६० जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाने २७ फेब्रुवारी आणि ३ मार्च अशा दोन टप्प्यात मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आयोगाने मतदानाच्या तारखांमध्ये बदल केल्याने आता २८ फेब्रुवारी आणि ५ मार्च रोजी मतदान होणार आहे.
हे ही वाचा:
‘संजय राऊत यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली?’
भीमा-कोरेगाव आयोगाने पवारांची केली तासभर चौकशी!
रशिया-युक्रेन संकटामुळे शेअर बाजार कोसळला….
उत्तराखंड: गाडी दरीत कोसळून १४ जणांचा मृत्यू
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी हे सोमवारी मणिपूरच्या निवडणुकीच्या दौऱ्यावर होते. तर आज इम्फाळ पूर्व येथील लुवांगसांगबम क्रीडा संकुलात रॅलीला पंतप्रधान संबोधित करणार आहेत.