लखनौमध्ये मित्राच्या वाढदिवसानिमित्त भर रस्त्यात समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्याने हवेत गोळीबार केला. या गैरप्रकारचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन दोघांना अटक केली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे रस्त्यावरील नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली.
गुरुवारी, ७ एप्रिलला लखनौमधील सुशांत गोल्फ सिटीमध्ये असलेल्या प्लासिओ मॉलजवळ काही तरुणांनी त्यांचा मित्र मनीष तिवारी याच्या वाढदिवसाचा रस्त्यात केक कापला. त्यानंतर सपाचे कार्यकर्ते नीरज सिंग यांनी हवेत गोळीबार केला. त्यामुळे रस्त्यावरून जाणारे लोक घाबरले आणि तेथून पळू जाऊ लागले. अचानक अशी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली आणि हे बघून त्या तरुणांनी तेथून पळ काढला.
दुसऱ्या दिवशी जेव्हा या गैरप्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींची ओळख पटताच त्याच्या घरावर छापा टाकला. सपा नेते नीरज सिंग याची पोलिसांना लगेच ओळख पटली. त्यांनतर आरोपी नीरज आणि त्याचा साथीदार मनीष तिवारी शुक्रवारी रात्री उशिरा पिस्तुल घेऊन सुशांत गोल्फ सिटी पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले. त्यांनतर पोलिसांनी दोघांना अटक केली. या दंगलीत सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
‘एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचे अपयश’- अजित पवारांची प्रतिक्रिया
सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी; तर आंदोलकांना १४ दिवसांची कोठडी
१८ वर्षांवरील व्यक्तींना मिळणार बुस्टर डोस
सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी; तर आंदोलकांना १४ दिवसांची कोठडी
सपाचे कार्यकर्ते नीरज सिंग हे राजाजीपुरमचे रहिवासी आहेत. नीरज हे सपाचे जिल्हा सचिव राहिले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच खळबळ उडाली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.