केंद्राचे राज्याला दोन प्रकल्प, फडणवीसांनी मानले केंद्राचे आभार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत प्रकल्पांची माहिती दिली आहे.

केंद्राचे राज्याला दोन प्रकल्प, फडणवीसांनी मानले केंद्राचे आभार

महाराष्ट्रातून गुंतवणूक बाहेर गेली अशी कित्याक दिवस ओरड चालू आहे. यातचं आज केंद्र सरकारने दोन हजार कोटींचे प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी केंद्राचे आभार मानले आहेत. महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक हब म्हणून विकसित करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. केंद्राने महाराष्ट्राला दिलेली ही भेट आहे. त्यामुळे केंद्र सरकराचे आभार मानायला हवेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

आपल्याला कल्पना आहे की, येणार काळ हा इलेकट्रोनिचा आहे. महाराष्ट्राला केंद्र सरकार टेक्सटाइल पार्क प्रकल्प देणार आहे. या प्रकल्पाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे. येणाऱ्या वर्षाच्या बजेटमध्ये याची घोषणा होण्याची शक्यता यावेळी फडणवीसांनी व्यक्त केली आहे. नवीन वर्षात महाराष्ट्राला केंद्र सरकार टेक्स्टाईल पार्क देणार आहे. त्यामुळे राज्यात टेक्स्टाईल क्लस्टर तयार होईल. महाराष्ट्रात २५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना कॅबिनेटने मान्यता दिली आहे. एका मीटिंगमध्ये आम्ही ते मंजूर केले आहेत, अशीही माहिती फडणवीसांनी दिली आहे.

हे ही वाचा:

भगतसिंगांच्या फाशीचा प्रसंग साकारताना शाळकरी मुलाचा मृत्यू

मुंबई महापालिकेच्या कामांची होणार ‘कॅग’कडून चौकशी

मोरबी दुर्घटनेत १३२ लोकांचा मृत्यू, अनेकांना वाचवण्यात पथकाला यश

भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पण पाकिस्तानची गोची

यावेळी फडणवीसांनी महाराष्ट्रातील नाणार येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे. फडणवीसांनी या नाणार रिफायनरी प्रकल्पाला गुंतवणुकीचा बाप असं संबोधलं आहे. ते म्हणाले, गुंतवणुकीचा बाप म्हणजे महाराष्ट्रात येऊ घातलेली रिफायनरी. विशेष म्हणजे या प्रकल्पामध्ये ७५ टक्के हिस्सा केंद्र सरकारच्या कंपन्यांचा आहे. १ लाख थेट रोजगार, ५ लाखांपर्यंत इतर रोजगार. ही रिफायनरी केरळला जाणार असल्याचं बोललं जात असलं तरी आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

Exit mobile version