भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत हल्ला झाला होता. याप्रकरणी आता दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
किरीट सोमय्या हे महानगरपालिकेत गेले असता त्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्यामुळे या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांनी हा हल्ला संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली व्हावी यासाठीही किरीट सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
हे ही वाचा:
… म्हणून काँग्रेस कार्यकर्त्याने काढल्या उठाबशा
‘ही तर संजय राऊतांची कोल्हेकुई’
डॉक्टर घेणार हिप्पोक्रॅटिक ओथ ऐवजी चरक शपथ?
‘काँग्रेसची हुजुरी करण्यासाठी संजय राऊत वाटेल ते बोलू शकतात’
कोविड जम्बो सेंटरमध्ये झालेल्या १०० कोटींच्या घोटाळयासंदर्भात निवेदन देण्यासाठी किरीट सोमय्या हे पुणे महानगरपालिकेत पोहचले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला केला. यावेळी किरीट सोमय्या हे पायऱ्यांवरून खाली पडले आणि त्यांना दुखापतही झाली. यावरून भाजप नेत्यांनी शिवसेनेवर आणि सरकारवर टीकास्त्र सोडले होते.