शिवसेनेचे नेते आणि माजी मुंबई पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने केलेल्या कारवाईनंतर त्यांच्या डायरीची चर्चा सुरू होती. आयकर विभागाच्या धाडीमध्ये मिळालेल्या यशवंत जाधव यांच्या त्या डायरीमध्ये ‘मातोश्री’ शिवाय अन्य दोन जणांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे. या डायरीमध्ये एकाचा उल्लेख ‘केबलमॅन’ आहे तर दुसऱ्या व्यक्तीचा उल्लेख ‘M-TAI’ असा आहे.
यशवंत जाधव यांच्या डायरीत ‘मातोश्री’ला २ कोटी रुपये आणि ५० लाखांचे घड्याळ दिल्याची नोंद होती. मातोश्री म्हणजे आपली आई असल्याचे यशवंत जाधवांनी सांगितले होते. त्यानंतर या डायरीमध्ये आणखी दोन नावांचा उल्लेख असल्याने यशवंत जाधव यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. यशवंत जाधव यांच्या डायरीत शिवसेनेच्या आणखी दोन नेत्यांची नावं आहेत. त्यातील एकजण मंत्रीपदावर आहे तर दुसऱ्या महिला नेत्या आहेत. या महिला नेत्या मुंबई महापालिकेत चर्चेत असतात, अशी माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा:
विक्रांत घोटाळ्याचे पुरावे राऊतांनीच द्यावेत! पण त्यांच्याकडे कागदोपत्री कोणताच पुरावा नाही
धक्कादायक! राज्यमंत्र्यांच्याच कॉलेजमध्ये मुलं पुस्तकात बघून लिहितायत उत्तरं
लेक्चरदरम्यान हिंदू देवतांचा अपमान करणारा प्रोफेसर निलंबित
वसंत मोरेंची मनसे पुणे शहर अध्यक्षपदावरून हकालपट्टी! भोंग्यांबाबतची भूमिका भोवली?
जाधव यांच्या डायरीत ‘केबलमॅन’ अशा नावासमोर त्यांनी ७५ लाख, २५ लाख आणि २५ लाख असे एक कोटी 25 लाख दिल्याचा उल्लेख केला आहे. तर ‘M-TAI’ नावासमोर ५० लाख रुपये दिल्याचा उल्लेख आहे. जाधव यांच्या डायरीतले ‘केबलमॅन’ आणि ‘M-TAI’ असा उल्लेख असणारे हे व्यक्ती कोण याबद्दल अद्याप समोर आलेले नाही.