कोळसा घोटाळ्याच्या खटल्यांसाठी दोन न्यायाधीशांची नियुक्ती

कोळसा घोटाळ्याच्या खटल्यांप्रकरणात नव्या न्यायाधिशांची नेमणुक सर्वोच्च न्यायालयाने केली. दिल्लीच्या उच्च न्यायलयाने नव्या न्यायाधिशांची नावे सुचवली होती.

कोळसा घोटाळ्याच्या खटल्यांसाठी दोन न्यायाधीशांची नियुक्ती

सर्वोच्च न्यायालयाने २०१४ पासून रखडलेल्या कोळसा घोटाळ्याबाबतच्या खटल्यांचा निकाल लावण्यासाठी दोन विशेष न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे. अरुण भारद्वाज आणि संजय बन्सल यांनी विशेष न्यायधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

यापूर्वी भारत पराशर हे सुमारे ४० पेक्षा जास्त कोळसा घोटाळ्याचे खटले हाताळत होते. आता त्यांची जागा हे दोन नवे नियुक्त न्यायाधीश घेणार आहेत. पराशर यांच्या जागी इतर दुसऱ्या कुठल्यातरी न्यायधीशाची नियुक्ती करावी या दिल्ली उच्च न्यायालयाच्या विनंतीला मान देऊन सर्वोच्च न्यायलयाने भारद्वाज आणि बन्सल यांची नियुक्ती केली आहे.

हे ही वाचा:

कुबेरांच्या ‘निर्भीड’पणाचे रहस्य काय?

अनिल देशमुखांचा राजीनामा हे केवळ हिमनगाचं टोक

नक्षलवादाविरुद्धची लढाई अधिक मजबूत होईल

दिल्ली उच्च न्यायालयाने सुचवलेल्या नावांपैकी पाच नावांचा विचार सर्वोच्च न्यायाधीश न्यायमुर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठातर्फे केला जात होता. दिल्ली न्यायालयाने सर्वच नावे ‘उत्तम’ म्हणूनच सुचवली होती. या खंडपीठात न्यायमुर्ती बोबडे यांच्यासोबत न्यायमुर्ती ए एस बोपण्णा आणि न्यायमुर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांचा समावेश होता. त्यांनी पराशर यांच्याबदली एक न्यायाधीश निवडण्याऐवजी सरकारी वकील सुचवल्यानंतर दोन न्यायधीशांची नेमणुक केली. त्यामुळे आता हे दोन न्यायाधीश कोळसा घोटाळ्याशी निगडीत खटले हाताळणार आहेत.

सर्वोच्च न्ययालयाने दाखल करण्यात आलेल्या अनेक जनहित याचिकांची दखल घेत २०१४ मध्ये सरकारने १९९३ ते २०१० या काळात केलेले कोळसा खाणींचे वाटप रद्द केले होते. वकिल एम एल शर्मा यांच्या जनहित याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने विशेष सीबीआय न्यायालयाच्या मार्फत सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते.

Exit mobile version