28 C
Mumbai
Sunday, November 3, 2024
घरराजकारणप्रकाश गंगाधरे यांच्या पुढाकाराने मुलुंडमध्ये दोन नव्या वातानुकूलित बस

प्रकाश गंगाधरे यांच्या पुढाकाराने मुलुंडमध्ये दोन नव्या वातानुकूलित बस

Google News Follow

Related

मुंबईच्या या घामाघूम करणाऱ्या वातावरणात मुलुंडकरांसाठी एक दिलासादायक गोष्ट घडली आहे. मुलुंडमध्ये आता महत्वाच्या मार्गांवर दोन नव्या वातानुकूलित बस धावणार आहेत. बेस्ट कमिटी सदस्य आणि मुलुंड मधील स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्या प्रयत्नाने ही बस सेवा सुरु झाली आहे.

मुलुंड येथील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे हे एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. मुंबईच्या उकाड्यात बसने फिरणाऱ्या सामान्य मुंबईकरांचे हाल होतात. रणरणत्या उन्हात प्रवास करणाऱ्या सामान्य माणसाचा बस प्रवास सुखकर व्हावा यासाठी गंगाधरे यांनी विशेष पुढाकार घेऊन मुलुंड मध्ये २ वातानुकूलित बसेस सुरु केल्या आहेत.

हे ही वाचा:

एका दिवसात एक कोटी लसीकरणाची भारताची हॅटट्रिक

भारतीय गोलंदाजीसमोर इंग्लंड ढेपाळला! भारताला २-१ आघाडी

सिरीया, इराकमधून आलेल्या शेजाऱ्यांनी त्याला बनवले अतिरेकी

गर्भवती महिलेला तालिबान्यांनी कुटुंबासमोर घातल्या गोळ्या

मुलुंड (प) रेल्वे स्थानक ते वैशाली नगर, बी आर रोड, मुलुंड (पश्चिम) ह्या मार्गवर वातानुकुलीत बेस्ट बस क्रमांक ए४०१ ही धावणार आहे. तर मुलुंड (प) रेल्वे स्थानक ते डॉ.आर पी रोड, एन एस रोड, देवीदयाल रोड, एल बि एस मार्ग, गुरू गोविंद सिंग मार्ग, खिंडी पाडा ह्या मार्गवर वातानुकुलीत बेस्ट बस क्रमांक ए६९१ सेवेत असणार आहे.

ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्या शुभहस्ते रविवार,५ सप्टेंबर रोजी या वातानुकूलित बसेसचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी मुलुंड विधानसभा अध्यक्ष मनीष तिवारी, भाजपा मुलुंड विधानसभा महामंत्री नंदकुमार वैती व प्रकाश मोटे, वॉर्ड क्र.१०४ अध्यक्ष राजेंद्र मोहिते, राजकुमार नाडार, राजेंद्र राहटे, आर.पी.आई मुलुंड तालुका अध्यक्ष योगेश शिलवंत, वॉर्ड क्र.१०७ अध्यक्ष सुनील टोपले, योगेश मकवाना आणि ईतर पदाधिकारी व स्थानिक व्यापारी वर्ग उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा