29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरक्राईमनामाराजकीय भूकंपाची शक्यता, दोन मंत्र्यांची होणार एनआयएकडून चौकशी?

राजकीय भूकंपाची शक्यता, दोन मंत्र्यांची होणार एनआयएकडून चौकशी?

Google News Follow

Related

अँटिलियाजवळ स्फोटकं सापडल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची तकडाफडकी बदली देखील करण्यात आली आहे. आता या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील एक-दोन मंत्र्यांची सुद्धा चोकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मुंबई क्राईम ब्रांचचे जॉईंट कमिश्नर मिलिंद भारंबे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना एनआयए माहिती घेण्यासाठी बोलवण्याची शक्यता आहे.

कालच पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वझे आणि परमबीर सिंग हे खूप छोटे खेळाडू आहेत असं सांगितलं होत. या प्रकरणाचे सूत्रधार कोण आहेत याचा तपस होऊन त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं. एनआयएने हे प्रकरण चौकशीसाठी हाती घेतल्यानंतर वेगाने हाललाची होताना दिसत आहेत. येत्या एक-दोन दिवसात या सर्वांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. सचिन वाझे हे सीआययू (क्राईम इन्वेस्टिगेशन युनिट) मध्ये नियुक्त होते. हा विभाग मुंबई क्राईम ब्रांचच्या अंर्तगत येतो. त्यामुळे सचिन वाझे यांचे क्राईम ब्रांचचे उपायुक्त प्रकाश जाधव, जॉईंट पोलीस कमिश्नर मिलिंद भारंबे हे वरिष्ठ होते. त्यांना रिपोर्ट करणे सचिन वाझे यांना बंधनकारक होतं. मात्र, सचिन वाझे हे डायरेक्ट पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या संपर्कात होते. यामुळे सचिन वाझे यांची कामाची कार्यपद्धती एनआयएच्या अधिकाऱ्यांना जाणून घ्यायची आहे.

हे ही वाचा:

उरातला साधेपणा हे मनोहर पर्रिकरांचे वैशिष्ट्य होते- अतुल भातखळकर

सचिन वाझेंनी वापरलेला शर्ट एनआयएच्या ताब्यात

उत्तराखंडमध्ये रेल्वे अचानक उलट धावली

सचिन वाझे यांनी अनेक महत्त्वाच्या केसेसचा तपास केला आहे. टीआरपी केस, फेक फॉलोवर केस, डीसी कार केस आदी अनेक महत्त्वाच्या प्रकरणाचा तपास केला आहे. या केसेस सचिन वाझे यांच्याकडे कशा गेल्या? त्या केसेस माहितीच्या आधारावर झाल्या आहेत की कशा प्रकारे झाल्या आहेत? सचिन वाझे यांच्याकडे केसेस कशा सोपवल्या जायच्या? जिलेटिन कार प्रकरण वाझे यांच्याकडे का देण्यात आलं? त्याचा प्रमुख तपास अधिकारी म्हणून सचिन वाझेंना कुणी आणि का नेमलं? प्रोसिजरने नेमले की इतर काही कारण होतं? अशा अनेक मुद्यांवर मिलिंद भारंबे आणि इतर आधिकाऱ्यांकडे चौकशी केली जाणार असल्याचं समजत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा