देशभरात कोविडची दुसरी लाट आली आहे. अनेक राज्यांत रुग्णवाढ भयावह वेगाने होत आहे. त्यामुळे काही अखेरीस टाळेबंदीचा पर्याय स्वीकारला आहे. यात आता ओडिशा आणि हरियाणा राज्यांची देखील भर पडली आहे.
रुग्णसंख्या हाताबाहेर जायला लागल्यामुळे अखेरीस हरियाणा आणि ओडिशा या राज्यांनी देखील टाळेबंदी लागू केली आहे. हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी हरियाणाच्या टाळेबंदी बाबात माहिती दिली आहे.
हे ही वाचा:
राष्ट्रवादी, शिवसेनेला दुसऱ्याच्या लग्नात नाचायची सवय!
निवडणुक आयोग विजय मिरवणुकांवर नाराज
भाजपाचे आवताडे महाविकास आघाडीवर भारी
कोविड रुग्णांसाठी वायुरुप प्राणवायू वापरण्याबाबत मोदींकडून चाचपणी
हरियाणा
हरियाणामधील टाळेबंदीला ३ मे पासून सुरूवात होणार आहे. ही टाळेबंदी ७ दिवसांची राहणार आहे. कोरोना बाधितांची संख्या सतत वाढती राहिल्याने हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हरियाणातील अनेक जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन यापूर्वीदेखील लागू होताच. दर शुक्रवारी रात्री १० वाजल्यापासून सोमवारी सकाळी ५ वाजेपर्यंत या लॉकडाऊनची कालमर्यादा आहे. गुरूग्राम, पंचकुला, फरिदाबाद, सोनपत, रोहतक, कर्नाल, हिसार, सिरसा आणि फतेहबाद या जिल्ह्यांत हा लॉकडाऊन लावण्यात आला होता.
ओडिशा
ओडिशामधील लॉकडाऊनला सुरूवात ५ मे पासून होणार आहे. ही टाळेबंदी देखील १४ दिवसांची असेल. राज्याचे प्रधान सचिव एस सी मोहपात्रा यांनी काढलेल्या आदेशानुसार या टाळेबंदीच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवाच उपलब्ध राहणार आहेत. हा लॉकडाऊन ५ मे २०२१ ते १९ मे २०२१ या काळापुरताच मर्यादित राहणार आहे. या काळात औषधांची दुकाने चालू असतील.
लॉकडाऊन घोषित केला असला तरीही निवडणुकीशी निगडित कोणतेही काम या टाळेबंदीमुळे बंद राहणार नसल्याचे स्पष्ट केले गेले आहे. ओडिशाच्या पिपली मतदारसंघात पोटनिवडणुक होणार आहे. या निवडणुकीचे मतदान १६ मे रोजी पार पडणार आहे. त्याच्याशी निगडित कोणत्याही कामावर या टाळेबंदीचा काहीही परिणाम होणार नसल्याचे सांगितले जात आहे.