23 C
Mumbai
Friday, December 20, 2024
घरक्राईमनामासाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना ब्लॅकमेल करणाऱ्या दोघांना अटक

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना ब्लॅकमेल करणाऱ्या दोघांना अटक

Google News Follow

Related

भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना लैंगिक शोषणामध्ये अडकवण्याचा कट रचणाऱ्या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. एमपी पोलिसांनी भरतपूर येथील सिक्री येथे छापा टाकून त्यांना अटक केली आहे. अटक केलेले दोघेही सख्खे भाऊ आहेत. भोपाळ पोलीस या दोघांना ट्रान्झिट रिमांडवर भोपाळला घेऊन जात आहेत.

हे सायबर क्राईमचे प्रकरण आहे. आरोपींना पकडून मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ठाकूर यांनी आठ दिवसांपूर्वी भोपाळच्या टीटी नगरमध्ये लैंगिक शोषणाचा कट रचल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी रवीन (२३) व वारस (२१) हे दोघेही फसवणुकीचे गुन्हे करतात. दोन्ही भाऊ कमी शिकलेले आहेत मात्र सायबर गुन्हे करण्यात ते माहीर आहे. ते दोघे सर्वसामन्य कुटुंबातून असून त्यांचे कुटुंब शेती करतात.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर एक व्हाट्सअप वर ‘हॅलो, मला तुमच्याशी बोलायचे आहे.’असा मेसेज आला. त्यावर त्यांनी प्रतिउत्तर दिले, ‘बेटा तुमचा पूर्ण परिचय पाठवा.’ काही वेळाने खासदारांना त्याच नंबरवरून व्हिडिओ कॉल आला त्यावेळी त्यांनी तो फोन उचलला आणि त्या व्हिडिओ कॉलवर एक मुलगी दिसत होती. तिने कपडे काढायला सुरुवात केली.

त्यावर खासदाराने व्हिडिओ कॉल कट करून ब्लॉक केले. काही वेळाने दुसऱ्या नंबरवरून एक फोटो आला. फोटोमध्ये पहिल्या नंबरवरून आलेल्या व्हिडिओ कॉलचा स्क्रीन शॉट होता. तो सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी खासदाराला दिली. यानंतर दुपारी अडीच वाजेपर्यंत खासदारांना दुसऱ्या क्रमांकावरून फोन येत राहिले. तरीही खासदारांनी फोनला उत्तर दिले नाही.

हे ही वाचा:

… म्हणून उत्तराखंडमध्ये माजी मुख्यमंत्री हरीश रावत मतदानाला मुकले

भारतीय नागरिकांनाही युक्रेनमधून बाहेर पडण्याचे आदेश

चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी!

येत्या ४८ तासांत रशियाचे युक्रेनवर आक्रमण?

७ फेब्रुवारी रोजी ठाकूर यांनी टीटी नगर, भोपाळ येथे तक्रार नोंदवली. भोपाळ पोलिसांनी कॉलर नंबर ट्रेस केले तेव्हा तो नंबर भरतपूर जिल्ह्यातील सिक्री येथील चंदा का बस बन्नी गावाच्या पत्त्यावर नोंदवण्यात आला होता. भोपाळ पोलिसांनी भरतपूर पोलिसांसह आरोपींना पकडण्यासाठी योजना आखली.

आणि त्या योजनेप्रमाणे भोपाळचे उपनिरीक्षक देवेंद्र साहू त्यांच्या पथकासह सोमवारी दुपारी सिकरी पोलिस ठाण्यात पोहोचले. सायबर सेलकडून दोन्ही आरोपींचे लोकेशन ट्रेस करण्यात आले होते त्यामुळे पोलिसांना आरोपीच्या हालचालींची माहिती होती. भोपाळ आणि सिक्री पोलिसांनी मिळून चंदा का बस बन्नी गावात दुपारी ३ वाजता छापा टाकला आणि घरातून रवीन आणि वारिसला अटक केली. या दोन आरोपींचा साध्वी यांना अश्या प्रकरणात गोवण्याचा कट होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा