राज ठाकरे ५ जूनला जाणार अयोध्येला; मुस्लिमांनाही भोंग्याचा त्रास

राज ठाकरे ५ जूनला जाणार अयोध्येला; मुस्लिमांनाही भोंग्याचा त्रास

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हे दोनदिवसांपासून पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी हनुमान जयंतीनिमित्त पुण्यात महाआरती केली होती. त्यांनतर रविवारी, १७ एप्रिल रोजी पुण्यात राज ठाकरेंनी रक्तदान शिबीराला आणि आंबा महोत्सवाला भेट दिली. त्यांनतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन महत्वाच्या आणि मोठ्या घोषणा केल्या आहेत.

१ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरे हे संभाजी नगरला सभा घेणार आहेत. तसेच, ५ जूनला राज ठाकरे त्यांच्या सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार आहेत, या दोन मोठ्या घोषणा ठाकरेंनी केल्या आहेत.

राज ठाकरे मशिदीवरील भोंग्यांसंबधी घेतलेल्या भूमिकेबद्दल देखील पत्रकार परिषदेत बोलले आहेत. ते म्हणाले, मशिदीवरील भोंगा हा धार्मिक विषय नसून तो एकी सामाजिक विषय आहे. या भोंग्यांचा त्रास मुस्लिम समाजातील लोकांनाही होत असल्याचा ठाकरे म्हणाले. याबद्दल राज ठाकरेंनी एक घटना सांगितली आहे. एक मुस्लिम पत्रकाराने मनसेचे नेते बाळ नांदगावकर यांची भेट घेतली आणि मशिदीवरील भोंग्यांचा त्रास त्याच्या लहान बाळालाही होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी त्या मुस्लिम पत्रकाराने स्वतः मशिदीत जाऊन भोंग्यांचा त्रास होत असल्याचे सांगितले आहे. त्यावरून राज ठाकरेंनी मुस्लिम समाजालाही भोंग्यांचा त्रास होत असल्याचे म्हटले आहे.

राज ठाकरे हे ३ एप्रिलच्या अल्टीमेटमवर ठाम असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, देशाच्या न्यायव्यवस्थेपेक्षा जर धर्म मोठा वाटत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर देणार असल्याचे ठाकरे म्हणाले आहेत. जर मशीदीवर जर पाच वेळा भोंगे वाजणार असतील तर आम्हीही दिवसातून पाच वेळा दिवसातून हनुमान चालीसा वाजवू. मुस्लीम धर्मियांनी माणुसकीच्या नात्याच्या विचार करावा असेही ठाकरे म्हणाले आहेत. तसेच मुस्लीम धर्मियांच्या प्रार्थनेला आमचा विरोध नसून, भोंग्यांचा लोकांना होणारा त्रास हा याला आमचा विरोध आहे, असे ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले १०८ फुटी हनुमान पुतळ्याचे उद्घाटन

दिल्लीत शोभायात्रेत दिसल्या तलवारी

पीएफआयचा मुंब्रा अध्यक्ष अब्दुल मतीन शेखानी फरार

दिल्लीत शोभायात्रेत दिसल्या तलवारी

दरम्यान, १ मे रोजी महाराष्ट्र दिनी राज ठाकरे संभाजी नगरला सभा घेणार आहेत. तर ५ जूनला राज ठाकरे सहकार्यांसोबत आयोध्येला दर्शनासाठी जाणार आहेत. ठाकरेंनी जनतेला देखील दर्शनासाठी येण्याची विनंती केली आहे.

Exit mobile version