भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत कोविड घोटाळा झाल्याचा आरोप केला होता ,त्याप्रकरणी आता काल मंगळवारी दोघांना अटक केल्यामुळे आता खळबळ उडाली आहे. हि कारवाई मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने केलेली आहे. संजय राऊत यांचे भागीदार आणि सहकारी असलेले सुजित पाटकर यांच्या ‘लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीने’ १०० कोटी रुपयांचा घोटाळा कोविड सेन्टरच्या नावाने केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्याच प्रकरणावर आता हि मोठी कारवाई केली आहे.
₹१०० कोटींचा कोविड सेंटर घोटाळा दोघांची अटक,
सुजित पाटकर (संजय राऊत चे भागीदार) यांचा लाईफ लाईन कंपनी चा घोटाळा
हिशेब तर घेणार च pic.twitter.com/qjsrJuFPhj
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 1, 2023
सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस स्थानकांत याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. राजीव साळुंखे आणि सुनील कदम यांना अटक करण्यात आली आहे. भारतीय दंड विधान ४२०, ४०६, ४६५, ४६८, ४७१, ३०४(अ ) या अंतर्गत या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही सहा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा:
कर्मभूमी वानखेडेवर सचिनचा पुतळा उभा राहणार
मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांचे राजीनामे
शेकापला फटका, धैर्यशील पाटील भाजपात दाखल
देशभरात गाजत असलेल्या उमेश पाल हत्येचा कट ‘मुस्लिम होस्टेल’मध्ये शिजला…
मुंबई महापालिकेतील कोविड काळातील १०० कोटींचा घोटाळ्याचा अहवाल समोर आला होता. महापालिकेचे सहआयुक्त सुनील धामणे यांनी हा अहवाल सादर केला होता. तेव्हा तो अहवाल बनावट असल्याचे त्यांनी म्हंटले होते. पण अहवालाच्या शेवटी कारवाईची गरज नाही असा शेरा धामणे यांनी लिहिला होता. याप्रकरणात सुनील धामणे यांचीच चौकशी व्हावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती किरीट सोमय्या म्हणाले कि, सहआयुक्त सुनील धामणे यांच्या अध्यक्षतेखाली सहा एप्रिल २०२२ ला समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता पालिकेने दोन सदस्यांची समिती नेमली. या समितीच्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे म्हंटले आहे कि, या कंपनीची नोटरी बनावट आहे. महाराष्ट्र राज्यात पार्टनरशिप डिड करणे कायद्याने बंधनकारक आहे.