जामा मशीद निदर्शने प्रकरणी दोन आरोपींना अटक, तिघांचा शोध सुरु

जामा मशीद निदर्शने प्रकरणी दोन आरोपींना अटक, तिघांचा शोध सुरु

देशभरात नुपूर शर्माच्या वक्तव्याचे पडसाद उमटत आहेत. याप्रकरणी १० जून रोजी मध्य जिल्ह्यातील जामा मशिदीत निदर्शन झाली होती. यासंदर्भात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये पोलिसांनी आयपीसीचे कलम १५३ ए जोडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओवरून आंदोलन करणाऱ्या पाच आरोपींची ओळख पटवली होती. याप्रकरणी आता कारवाईला वेग आला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

जामा मस्जिदचा रहिवासी मोहम्मद नदीम (४३) आणि गली शंकर, तुर्कमान गेट रहिवासी फहीम (३७) अशी आरोपींची नावे आहेत. अन्य तीन आरोपींचा शोध सुरू आहे. आंदोलनात सहभागी असलेल्या इतर आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

१० जून रोजी दुपारी जामा मशिदीत नुपूर शर्मा यांच्या विरोधात घोषणाबाजी करत शुक्रवारची नमाज पठण करण्यात आली. या प्रार्थनेनंतर तेथे उपस्थित काही लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली. या आंदोलकांनी भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या अटकेची मागणी केली. येथे सुमारे वीस मिनिटे निदर्शने करण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रस्ता मोकळा केला. आंदोलकांना तेथून हटवण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात मध्यवर्ती जिल्ह्याच्या डीसीपी श्वेता चौहान यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे सांगितले होते. याबाबत त्यांनी आयपीसी कलम १८८ अंतर्गत एफआयआरही दाखल केला आहे.

हे ही वाचा:

“देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला जागा दाखवली”

‘राज्यसभा निवडणूक निकालानंतर अनेकांच्या तोंडचं पाणी पळालंय’

देवेंद्र फडणवीस यांची चौफेर घोडदौड

“संजय राऊत ब्रह्मदेव आहेत काय? मतदान दिलं नाही हे कसं कळालं?”

डीसीपी श्वेता चौहान यांनी सांगितले की, या प्रकरणातील पाच आरोपींची ओळख ११ जून रोजी पटली होती. त्यांच्या शोधात पोलीस पथकाने छापा टाकून दोन आरोपींना अटक केली. याशिवाय अन्य आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दोन समुदायांमधील शत्रुत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी या एफआयआरमध्ये आयपीसीचे कलम १५३ ए देखील जोडण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी पोलीस पोस्टर लावणाऱ्या लोकांचीही माहिती गोळा करत आहेत. ती छापणाऱ्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे चौहान यांनी सांगितले आहे.

Exit mobile version