ट्विटरवर रंगले ‘धर्म’ युद्ध!

ट्विटरवर रंगले ‘धर्म’ युद्ध!
रविवारच्या निवांत दिवशी ट्विटरवर मात्र ‘धर्म’ युद्ध रंगल्याचे पहायला मिळत आहे. संजय राऊत यांच्या ट्विटने ह्याची सुरूवात झाली असून भारतीय जनता पार्टी कडून त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रविवारी सकाळी आपल्या ट्विटरवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो ट्विट केला. या फोटोत शिवरायांच्या हातात एक राजदंड दिसत आहे. “शिवरायांच्या हातातील राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन” असा मजकूर या फोटोवर लिहिला आहे. राऊतांच्या याच ट्विटवरून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे.
लाजधर्म सोडून,माजधर्म स्विकारला
“महाराष्ट्रात जनाबसेनेने लाजधर्म सोडला, गब्रूंना पाठिशी घालणारा माजधर्म स्विकारला, मग राजधर्म औषधाला तरी शिल्लक राहिली का?” असा सवाल भातखळकर यांनी आपल्या ट्विटरवरून विचारला आहे.
महाराष्ट्रात फक्त सत्ताधर्म
भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील ट्विट करत शिवसेनेवर चांगलेच तीर चालवले आहेत. महिलेवर अत्याचार करणाऱ्या पाटलाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या शिक्षेची आठवण काढताना. “महाराष्ट्रात फक्त सत्ताधर्म सुरू आहे” असे उपाध्येंनी म्हटले आहे.
सोमवारपासून महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू होत आहे. पुजा चव्हाण प्रकरणावरून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मौन पाळत संजय राठोडांविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. यावरून विरोधक आक्रमक झाले असुन विधीमंडळात सरकारला घेरण्यासाठी सज्ज आहेत. या पार्श्वभूमीवर ट्विटरवर रंगलेल्या या ‘धर्म’युद्धाची चांगलीच चर्चा आहे.
Exit mobile version