ट्विटर अखेर तक्रार अधिकारी नेमणार

ट्विटर अखेर तक्रार अधिकारी नेमणार

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर लवकरच तक्रार अधिकारी नियुक्त करणार आहे. याबाबत माहिती देताना कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, कंपनी तक्रार अधिकारी नेमण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.

यापूर्वी, भारतात नियुक्त केलेल्या अंतरिम तक्रार अधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. खरं तर, नव्या आयटी नियमांनुसार भारतीय युजर्सच्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांमध्ये तक्रार अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत ट्विटरने धर्मेंद्र चतूर यांना अंतरिम तक्रार अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. तथापि, २१ जून रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर ट्विटरने म्हटले आहे की, कंपनी नवीन तक्रार अधिकारी नियुक्त करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार ट्विटर कंपनीचे वैश्विक कायदेशीर धोरण संचालक आणि अमेरिकन नागरिक जेरेमी केसल यांना भारतात तक्रार अधिकारी म्हणून नियुक्त करणार आहे. तथापि, नव्या नियमांनुसार या पदावर केवळ भारतीय नागरिकाची नेमणूक करणे गरजेचे आहे.

चतूर यांनी अशा वेळी राजीनामा दिला होता, जेव्हा ट्विटरवर सोशल मीडियाच्या नव्या नियमांवरून सरकारचा हल्ला सुरु होता. ट्विटरने हे नवीन नियम जाणीवपूर्वक न पाळल्याची टीका सरकारने केली आहे.

हे ही वाचा:

वारीला बंदी म्हणजे द्रौपदीच्या पदराला हात घालण्याचे पाप

या ठरावाने ओबीसींना आरक्षण मिळणार नाही

ठाकरे सरकार अजून किती स्वप्निलच्या आत्महत्येची वाट पाहणार?

ठाकरे सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय

गुगलने ‘कांटेक्ट अस’ पेजवर जो ग्रिअरचे नाव दिले आहे. त्याचा पत्ता माउंटन व्ह्यू अमेरिकेचा आहे. या पृष्ठावरील यूट्यूबसाठी तक्रार निवारण यंत्रणेविषयीदेखील माहिती प्रदान केली गेली आहे. नियमांनुसार, सर्व सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या वेबसाइटवर, अ‍ॅप किंवा त्या दोन्हीवर तक्रार निवारण अधिकारी आणि त्यांचा पत्ता द्यावा लागतो. तसेच तक्रारीची पद्धत सांगावी लागेल ज्याद्वारे वापरकर्ता किंवा पीडित आपली तक्रार करू शकतात.

Exit mobile version