22 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरराजकारणअखेर केंद्र सरकारसमोर ट्विटरला बनावे लागले 'विनय'शील

अखेर केंद्र सरकारसमोर ट्विटरला बनावे लागले ‘विनय’शील

Google News Follow

Related

भारत सरकारच्या कठोरपणापुढे अखेरीस नमते घेत ट्वीटरने विनय प्रकाश यांची भारतातील रेसिडेंट ग्रिवान्स ऑफिसर (निवासी तक्रारनिवारण अधिकारी) म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीने ट्वीटर भारताच्या नव्या आय टी नियमांपुढे झुकले असल्याचे दिसत आहे.

ट्वीटरने स्वतःच्या संकेतस्थळावर ही माहिती प्रसिद्ध केली आहे. विनय प्रकाश यांना निवासी तक्रारनिवारण अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून ट्वीटरचे वापरकर्ते त्यांच्याशी इमेलद्वारे संपर्क साधू शकतात असे सांगण्यात आले आहे. ट्वीटरने स्वतःचा पत्ता देखील संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. ट्वीटरसोबत खालील पत्त्यावर संपर्क केला जाऊ शकेल. त्यासाठी ट्वीटरचा देण्यात आलेला पत्ता ‘४था मजला, द इस्टेट, १२१ डिकन्सन रोड, बंगळूरू ५६००४२’ हा आहे.

ट्वीटरच्या जागतिक पातळीवरील कायदेशीर धोरणे अधिकारी जेरेमी केसल यांच्या सोबत प्रकाश यांचे नाव झळकत आहे. जेरेमी हे अमेरिकेत स्थित आहेत.

या बरोबरच कंपनीने २६ मे २०२१ पासून २५ जून २०२१ अनुपालन अहवाल (कॉम्प्लायन्स रिपोर्ट) देखील प्रसिद्ध केला आहे. २६ मे रोजी लागू करण्यात आलेल्या नव्या आयटी कायद्यांतर्गत ही एक महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे.

यापूर्वी ट्वीटरने धर्मेंद्र चतुर यांची याच पदावर नियुक्ती केली होती. त्यांची निवड अंतरिम अधिकारी म्हणून झाली होती. परंतु गेल्या महिन्यात त्यांनी या पदाचा राजिनामा दिला होता.

हे ही वाचा:

‘उज्ज्वल’ भविष्यासाठी शिवसेना प्रयत्नशील

लाल माकडं आणि नव लिबरल डोंबारी

दहशतवाद्यांना मदत कराल तर याद राखा!

अफगाणिस्तानमध्ये धोका; भारतीय अधिकाऱ्यांना आणले माघारी

भारताने नवे आयटी नियम लागू केल्यानंतर ट्वीटर आणि भारत सरकार आमनेसामने आले होते. भारताच्या नव्या नियमांनुसार तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे ट्वीटरला भाग होते. परंतु ट्वीटरने या कायद्याची पूर्तता न केल्याबद्दल भारत सरकारने ट्वीटरला चांगलेच धारेवर धरले होते. ट्वीटरने हा खोडसाळपणा जाणिवपूर्वक केला आसल्याचा आरोप भारत सरकारकडून ट्वीटरवर सातत्याने करण्यात आला होता. अखेरीस ट्वीटरने शरणागती पत्करली आहे.

८ जुलै रोजी, दिल्ली उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या पदावर अंतरिम नियुक्ती करण्यात आली असून नियमांनुसार येत्या आठ आठवड्यात हे पद भरण्यात येईल असे म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा