मध्यरात्री योगी आदित्यनाथ यांचे ट्विटर हँडल हॅक

मध्यरात्री योगी आदित्यनाथ यांचे ट्विटर हँडल हॅक

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल शुक्रवार, ८ एप्रिल रोजी रात्री उशिरा हॅक करण्यात आले. योगी आदित्यनाथ यांचे ट्विटर हँडल हॅक केल्यानंतर हॅकर्सनी ट्विटर हँडलचे बायो आणि प्रोफाईलचे फोटो बदलले. त्यानंतर रात्री ट्विटर हँडलवरून एकामागून एक असे ५० हून अधिक पोस्ट टाकल्या तसेच आधीचे ट्विटही डिलीट करण्यात आले.

ट्विटर हँडल हॅक झाल्याची माहिती मिळताच खळबळ उडाली होती. हॅकरने मुख्यमंत्री योगींच्या ऑफिसऐवजी बायोमध्ये @BoredApeYC @YugaLabs लिहिले. एका ट्विटला पिन देखील करण्यात आले होते. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांचे ट्विटर हँडल रिस्टोअर करण्यात आले आहे. ट्विटर युजर्सना याची माहिती मिळताच त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांना टॅग करून याबाबत तक्रार केली. रात्री १.१० वाजता हे योगींच्या कार्यालयाचे ट्विटर हँडल पूर्ववत करण्यात आले.

@CMOfficeUP नावाच्या या हँडलला चार दशलक्षाहून अधिक वापरकर्ते फॉलो करतात. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची आणि निर्णयांची माहिती हँडलवरून दिली जाते.

हे ही वाचा:

आझाद मैदानातून हटवल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा सीएसएमटी स्थानकात ठिय्या

‘एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचे अपयश’- अजित पवारांची प्रतिक्रिया

सोमय्या पिता पुत्रांना मुंबई पोलिसांचे समन्स

गुणरत्न सदावर्तेंना अटक

याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे ट्विटर अकाउंटही हॅक करण्यात आले होते. हे समोर येताच काही वेळातच ही खाती पुन्हा पूर्ववत करण्यात आली आहेत.

Exit mobile version