महाराष्ट्रात कोरोना वाढत असताना, ‘महाराष्ट्र कोविड १९ कंट्रोल रूम’ सक्रिय नाही

महाराष्ट्रात कोरोना वाढत असताना, ‘महाराष्ट्र कोविड १९ कंट्रोल रूम’ सक्रिय नाही

महाराष्ट्रात सध्या कोविड पुन्हा एकदा हात पाय पसरताना दिसत आहे. सरकार पुन्हा एकदा नियमावली कडक करत आहे. अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात येत असून राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. पण या परिस्थितीत ‘महाराष्ट्र कोविड १९ कंट्रोल रूम’ मात्र निष्क्रिय दिसत आहे. इथे विषय ‘महाराष्ट्र कोविड १९ कंट्रोल रूम’ च्या अधिकृत ट्विटर खात्याचा आहे.

‘महाराष्ट्र कोविड १९ कंट्रोल रूम’ हे कोविड विषयीची माहिती देणारे अधिकृत ट्विटर खाते आहे. मंत्रालयाच्या कंट्रोल रूमचे हे अधिकृत खाते हे २०२१ च्या सुरवातीपासूनच पूर्णतः निष्क्रिय आहे. या खात्यावरून शेवटचे ट्विट गेल्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये ३० डिसेंबर रोजी करण्यात आले होते. त्यानंतर या खात्यावरून एकही ट्विट करण्यात आलेले नाही.

हे ही वाचा:

मंत्री अत्याचार करतायत सरकार पाठीशी घालतेय

आज महाराष्ट्राची परिस्थिती दिवसागणिक अधिकच बिकट होत चालली असून, दर दिवशीची रुग्णसंख्या वाढत आहे. काल एका दिवसात महाराष्ट्रातील रुग्ण संख्या ५००० ने वाढली आहे. आजच्या जमानात सोशल मीडिया हा लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे एक महत्वाचे माध्यम आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना महाराष्ट्र सरकारचे ‘महाराष्ट्र कोविड १९ कंट्रोल रूम’ हे महत्वाचे सरकारी ट्विटर खाते सक्रिय नसणे हे खूपच धक्कादायक आहे.

 

Exit mobile version