28 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारणट्विटरने पुन्हा जम्मू-काश्मीर आणि लडाख भारतापासून वेगळा दाखवला

ट्विटरने पुन्हा जम्मू-काश्मीर आणि लडाख भारतापासून वेगळा दाखवला

Google News Follow

Related

ट्विटरने पुन्हा एकदा भारताचा चुकीचा नकाशा दाखवला आहे. आपल्या वेबसाईटवर ट्विटरने जगाचा नकाशा जारी केला असून त्यात जम्मू-काश्मीर आणि लडाख वेगवेगळे देश असल्याचं दाखवलं आहे. म्हणजेच ट्विटरच्या मते जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचे भाग नाहीत. ट्विटरने हा खोडसाळपणा या पूर्वीही केला होता. त्यावेळी लडाखमधील पॅंगॉंग सो तलाव चीनमध्ये दाखवला होता. इतकंच नाही तर ही चूक दुरुस्त करायलाही अनेक दिवस भारत सरकारला तात्कळत ठेवलं होतं.

गेल्या काही दिवसांपासून ट्विटर विरुद्ध केंद्र सरकार अशा वादाची मालिका सुरु आहे. त्यातच आता भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याचा आरोप होत आहे. एका ट्विटर युझरने ही बाब समोर आणली आहे. ट्विटरच्या करिअर पेजवर गेल्यावर त्यावर दिसणाऱ्या नकाशात जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारतापासून विभक्त दाखवण्यात आले आहेत. यानंतर अनेक नेटिझन्सनी विविध सरकारी हॅण्डलला मेंशन करुन ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.

मागील वर्षीही ट्विटरने भारताच्या नकाशासोबत छेडछाड केली होती. ट्विटरविरोधात कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. याआधी १२ नोव्हेंबर रोजी सरकारने लेहला केंद्रशासित प्रदेश लडाखच्या ऐवजी जम्मू काश्मीरचा भाग दाखवल्याप्रकरणी ट्विटरला नोटीस जारी केली होती.

हे ही वाचा:

रेस ट्रॅकवर गाड्या का आणल्या? याचे थक्क करणारे स्पष्टीकरण

ट्विटरच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याचाच राजीनामा

पुलावामाध्ये माजी एसपीओची दहशतवाद्यांकडून हत्या

नव्या निर्बंधांविरुद्ध व्यापारी ‘या’ शहरांमध्ये आक्रमक

यावर सरकारने ट्विटरला नोटीस पाठवली आणि त्यानंतरही ट्विटरने दुरुस्ती केली नाही तर आयटी कायद्याच्या कलम ६९ अ अंतर्गत ट्विटरवर कारवाई केली जाऊ शकते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा