मलिकांची ट्विट्स म्हणजे अर्धसत्य आणि असत्य

केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया यांनी महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या खोट्याचा पर्दाफाश केला आहे. महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे बोट दाखवत रेमडेसिवीरच्या मुद्द्यावरून राजकारण करायचा प्रयत्न केला. पण केंद्रीय रसायन मंत्री मनसुख मांडवीया यांनी मलिक यांच्या या खोट्याचे सप्रमाण खंडन केले.

महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा उद्रेक झालेला आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार ही परिस्थिती हाताळण्यात पुरते अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रात ऑक्सिजन, बेड्स, रेमडेसिवीर या सगळ्याचाच तुटवडा आहे. अशा परिस्थिती ठाकरे सरकारमधील मंत्री आणि नेते आल्या दिवशी केंद्र सरकारच्या नावाने बोटे मोडून शिमगा करत असतात. पण अखेर सत्य समोर आल्यावर त्यांना तोंडावर पडायचीच वेळ येते. शनिवारी ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक हे असेच तोंडावर पडले जेव्हा केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया ह्यांनी मलिकांच्या खोटेपणाची पोलखोल केली.

हे ही वाचा:

नवाब मलिक नेहमी गांजा पिऊनच बोलतात का?

राज्यात पुरती बेबंदशाही

मुख्यमंत्री कोरोनाची लाट थोपवण्याची उपाययोजना करण्याचे सोडून वसूलीत गर्क

देवेंद्र फडणवीसांची मेयो आणि मेडीकल रुग्णालयाला भेट

नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. देशातील १६ निर्यातीच्या ठिकाणी २० लाख रेमडेसिवीर लसींचा साठा उपलब्ध आहे. एकीकडे रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घातली असली तरीही हा साठा भारतात विकायची परवानगी केंद्र सरकार देत नसल्याचा आरोप मालिकांनी केला आहे. सरकारचे म्हणणे आहे की रेमडेसिवीरचे उत्पादन करणाऱ्या ७ उत्पादक कंपन्यांनीच तो विकावा. पण या कंपन्या ही जबाबदारी घायला तयार नाहीत. या विषयी लवकरात लवकर निर्णय होणे गरजेचे आहे असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

मलिकांच्या याच ट्विट्सना उत्तर द्यायला केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया हे स्वतः मैदानात उतरले. “मलिक यांची ट्विट्स ही अर्धसत्य आणि असत्य गोष्टींनी भरलेली आहेत. त्यांना जमिनीवरचे वास्तव माहीत नाही. केंद्र सरकार हे महाराष्ट्र सरकारच्या नियमित संपर्कात आहे. देशातील रेमडेसिवीरचे उत्पादन आपण दुप्पट करत आहोत. उत्पादन वाढवण्यासाठी नव्या २० प्लॅंट्सना परवानगी देण्यात आली आहे. आम्ही सर्व उत्पादकांशी संपर्क साधला असता मलिक म्हणतात त्या प्रमाणे कोणतेही कंसाइन्मेंट अडकली नाहीये. तरीही मलिक यांनी त्या १६ कंपन्यांचे तपशील आम्हाला द्यावेत. आम्ही देशातील सामान्य जनतेसाठी कटिबद्ध आहोत.” असे मांडवीया म्हणाले.

Exit mobile version