30 C
Mumbai
Wednesday, November 13, 2024
घरक्राईमनामापरीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपे निलंबित

परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपे निलंबित

Google News Follow

Related

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी अटक झालेले महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना निलंबित करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने सुपे यांना निलंबित केले असून सोमवारी २० डिसेंबरला त्यांच्या निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला आहे. सुपे यांचे हे निलंबन त्यांच्या अटकेच्या दिनांकापासून असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

शालेय शिक्षण विभागाने सुपे यांच्या निलंबनाचा काढलेला हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत सुपे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मुख्यालय पुणे येथे राहतील आणि त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. तसेच या निलंबनाच्या कालावधीत त्यांनी खासगी नोकरी स्वीकारल्यास किंवा व्यवसाय केल्यास त्यांना गैरवतणुकीबाबत दोषी ठरवण्यात येईल आणि ते कारवाईस पात्र ठरतील, असेही या आदेशात म्हटले आहे.

हे ही वाचा:

कट्टरपंथी झाकीर नाईकच्या संघटनेवर भारतात बंदी

मतदार ओळखपत्राला नवा ‘आधार’! लोकसभेत विधेयक मंजूर

सरसंघचालक मोहन भागवतांची तिबेटियन धर्मगुरू दलाई लामांशी भेट

मुंबईकरांच्या नशिबी खराबच रस्ते; कंत्राटदाराच्या फायद्यासाठी उणे दराच्या निविदा

सन २०१९- २०२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमधील (टीईटी) गैरव्यवहाराबाबत सुपे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यानुसार त्यांना १६ डिसेंबर २०२१ रोजी अटक करण्यात आली. तुकाराम सुपे यांच्या घरातून १७ डिसेंबरला पहिल्या धाडी दरम्यान ८८ लाख ४९ हजार ९८० रोख, पाच ग्राम सोन्याचे नाणे, ५ लाख ५० हजार रुपयांची एफडी केल्याची कागदपत्रे जप्त केली होती. २० डिसेंबरला दुसऱ्या धाडीत सुपेंच्या घरातून २ कोटीहून अधिक रक्कम आणि सोने हस्तगत करण्यात आले.

म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात डॉ. प्रीतीश देशमुख यांच्या घरी केलेल्या छापेमारीत २०२०च्या टीईटी परीक्षेच्या सुमारे ४० ते ५० विद्यार्थ्यांचे ओळखपत्र सापडले होते. या आधारे टीईटी परीक्षेसंदर्भात चौकशी करून तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा