एसटी संपकरी वकील गुणरत्न सदावर्ते यांना काल, ८ एप्रिलला अटक करण्यात आली होती. आज, ९ एप्रिल रोजी पोलीसांनी सदावर्ते यांना किला न्यायालयात दाखल केले आहे. न्यायमूर्ती के.जी सावंत यांच्या खंडपीठासमोर सदावर्ते यांना सुनावणी होणार आहे.
किला न्यायलयात सदावर्ते यांना हजर करताना माध्यमांनी सदावर्ते यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी सदावर्ते म्हणाले, ” माझी हत्या होऊ शकते, माझ्या जीवाला धोका असून राज्यात लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला जोतोय. ” सदावर्ते यांना किला न्यायलयात हजर केले आहे. सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटीलसह तीन जण सदावर्ते यांची बाजू न्यायालयात मांडणार आहेत. वकील महेश वासवानी आणि घनश्याम उपाध्याय हे सदावर्ते य्नाची बाजू मांडणार आहेत.
जयश्री पाटील यांनीही माध्यमांना, त्यांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागे गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्त्यव्यांचे कारण असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी काल पोलिसांनी कालच सदावर्ते यांना ताब्यात घेतले होते त्यांच्यासोबत ११० आंदोलकांवर गुन्हा झाला होता. या ११० आंदोलकांना देखील न्यायालयात सुनावणी होणार आहे.
हे ही वाचा:
आझाद मैदानातून हटवल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा सीएसएमटी स्थानकात ठिय्या
‘एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचे अपयश’- अजित पवारांची प्रतिक्रिया
सोमय्या पिता पुत्रांना मुंबई पोलिसांचे समन्स
मध्यरात्री योगी आदित्यनाथ यांचे ट्विटर हँडल हॅक
शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यासाठी गुणरत्न सदावर्ते यांचे भाषण जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आज वकील गुणरत्न सदावर्ते यांना जेव्हा किला न्यायालयात हजर करताना त्यांची पत्नी आणि त्यांची दहा वर्षाची मुलगी झेन हेदेखील हजर होते. मुलीला उद्देशून गुणरत्न सदावर्ते यांनी ‘सॉरी’ असं म्हणाले आहेत. मात्र सदावर्ते यांनी मुलीला सॉरी का म्हणाले याची चर्च होत आहे.