भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शनिवार, २३ एप्रिल रोजी हल्ला झाला. या हल्ल्यात सोमय्या यांच्या गाडीच्या काचा फुटल्याने त्यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या. या हल्ल्यानंतर सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्यावर काल झालेल्या हल्ल्यामागे ठाकरे सरकारचाच हात आहे. हा हल्ला ठाकरे सरकारने स्पॉन्सर केला हातो, असा आरोप सोमय्यांनी केला आहे.
सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला घडवून आणला होता आणि या हल्ल्याला मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे जबाबदार असल्याचे सोमय्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, हा हल्ला ठाकरे पुरस्कृत होता. मी येणार हे माहिती असल्याने आधीपासूनच पोलिस स्टेशनमध्ये ८० शिवसैनिकांनी एकत्र येण्याची तयारी केली होती. पोलिसांच्या दारात कसे काय एवढे गुंड असू शकतात, असा सवालही सोमय्यांनी यावेळी केला. मात्र पोलीसांनी यावर जास्त काही प्रतिक्रिया दिली नाही.
त्यांनतर खार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली. त्यानंतर मी पोलिस ठाण्यातून बाहेर पडलो आणि याच ८० शिवसैकिनांनी माझ्यावर हल्ला केला आहे. मला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, मला दुखापत झाली. माझ्या ड्राइवर आणि माझ्या सोबत असणाऱ्या आठ कमांडरमुळे माझा जीव वाचला, असे सोमय्या म्हणाले.
माझा मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार करत असल्याचा गंभीर आरोप सोमय्यांनी केला आहे. ते म्हणाले, मी पोलिस ठाण्यात जाणार याची माहिती पोलिसांनी याआधीच शिवसैनिकांना दिली होती. पोलिसांनी या शिवसैनिकांच्या हवाली माझ्या गाड्या करण्याचे काम केले. जे पाच पोलीस माझ्यासोबत होते, त्यांना ताबडतोब निलंबित करण्याची मागणी सोमय्यांनी केली आहे. ठाकरे सरकार पोलिसांचे माफिया म्हणून उपयोग करत आहे. तीन वेळा माझ्यावर हल्ला करण्यात आला, माझा मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार करत आहे. तसेच संजय राऊत जे काही बोलत आहेत ते सर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शब्द असतात. शिवसेना ही आता गुंडसेना झाली असल्याचे सोमय्या म्हणाले.
हे ही वाचा:
मुंबई पोलीस आयुक्त उद्धव ठाकरेंचे चपरासी आहेत का?
राणा दांपत्याला भेटून येताना किरीट सोमय्यांवर हल्ला; गाडीची काच फुटून जखमी
‘मुंबईच्या डोक्यावरून भ्रष्टाचाराची सत्ता आम्ही उतरवणार’
‘१८ वर्षे पूर्ण झालेल्या उमेदवारांची मतदार नोंदणी महाविद्यालयातच व्हावी’
पुढे ते म्हणाले, मुंबई पोलिसांनी माझ्या नावाने खोटी एफआयआर दाखल केली. ही एफआयआरवर खोटी असून मी सही करणार नाही असे सोमय्या यांनी सांगितले होते. माझ्यावर चप्पल, काचेच्या बाटल्या, चप्पल मारण्यात आले. माझ्यापासून शिवसेनेचे लोक तीन किलोमीटर दूर होते. लांबून एक दगड येऊन गाडीवर पडला असे या खोट्या एफआयआरमध्ये म्हटले आहे, असंही ते म्हणाले. माझा जीव घेण्याचा प्रयत्न खार पोलिसांच्या मदतीने शिवसेनेच्या गुंडांनी केला.
सोमवार,२५ एप्रिल रोजी दिल्लीला जाऊन, केंद्रीय गृहसचिवांना भेटणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. तसेच गृहसचिवांना या हल्ल्याची सर्व माहिती देणार असल्याचे सोमय्या म्हणाले.