महाविकास आघाडीच्या नेत्यांची मागणी
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने आता परमबीर सिंग यांना शोधा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत परमबीर कुठे आहेत त्यांना शोधा, अशी मागणी केली होती तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही रविवारी सामनातील लेखातून परमबीर यांना शोधण्याची जबाबदारी केंद्रावर ढकलली आहे. पण या दोन्ही वेळेला अनिल देशमुख हे कुठे आहेत हे सांगण्याची तयारी महाविकास आघाडीतील कुणाचीही का नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर अनिल देशमुखांच्या घरांवर ईडीचे छापे पडले. अजूनही ही छापेमारी सुरू आहे. मात्र राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख हे अद्याप समोर आलेले नाहीत. मध्यंतरी त्यांनी एका छोट्या व्हीडिओतून संदेश पाठविला होता, पण ते कुठे आहेत हे स्पष्ट झाले नव्हते. सर्वोच्च न्यायालयात आपल्यावरील खटल्याचे काय होते, हे स्पष्ट झाल्यावर समोर येण्याचे त्यांनी म्हटले होते. पण अजूनही ते अज्ञातवासातच आहेत. सामनातील लेखात संजय राऊत यांनी सीबीआयने देशमुखांचा शोध घेण्यापूर्वी परमबीर यांना समोर आणावे, असा अनाहूत सल्ला दिला आहे.
हे ही वाचा:
पुण्यात गाडीने पोलिसाला ८०० मीटर फटफटत नेले
‘तुष्टीकरणाविरोधात आवाज उठवल्यावर सत्ताधारी शिवसेनेने पळ काढला…’
भारतातील बैठकीसाठी पाकिस्तानलाही दिले निमंत्रण
‘टीके से बचेगा देश’…भारताचे वॅक्सीन अँथेम ऐकलेत का?
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हेदेखील गायब आहेत. मात्र महाविकास आघाडीने सातत्याने केवळ परमबीर सिंग कुठे आहेत, यावरच भर दिला आहे. या आघाडीचे माजी गृहमंत्री असलेले अनिल देशमुख कुठे आहेत आणि त्यांचा शोध कोण घेणार आहे, हे मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे अनिल देशमुखांचा महाविकास आघाडीला विसर पडला आहे का, असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.