“अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांचे चित्रीकरण रोखून दाखवाच. महाराष्ट्रात काय मोगलाई काय?”- गिरीश महाजन

“अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांचे चित्रीकरण रोखून दाखवाच. महाराष्ट्रात काय मोगलाई काय?”- गिरीश महाजन

“इंधन दरवाढीवरून बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांनी ट्विट करावं नाही तर त्यांचे शुटिंग रोखण्यात येईल.” असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता. त्यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी पलटवार केला आहे. “अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांचे चित्रीकरण रोखून दाखवाच. महाराष्ट्रात काय मोगलाई काय?” असे आव्हान गिरीश महाजन यांनी दिले आहे. शिवजयंतीला ठाकरे सरकारने, शाहीर हेमंतराजे मावळे यांनाही ताब्यात घेतले होते.

हे ही वाचा:

“अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारचे चित्रपट बंद पाडू” – नाना पटोले

महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि नुकतेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे पिक्चर बंद पाडू अशी धमकी दिली होती. पेट्रोल-डिझेलच्या मुद्दयावरून कोणीही राजकारण करू नये. राम मंदिर हा आमच्या आस्थेचा विषय आहे, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला.

हे ही वाचा:

“देशातील प्रश्नावर बोलण्याचा अक्षय कुमारला अधिकार नाही”- आव्हाडांची मुक्ताफळे

“राज्यातील कोरोनाच्या स्थितीला राज्य सरकारच जबाबदार आहे. महाविकास आघाडीतील नेते जाहीर कार्यक्रम घेत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढत आहेत. राज्य सरकारला अधिवेशन होऊ द्यायचे नाही. त्यामुळे हा कांगावा केला जात आहे.” असा आरोपही गिरीश महाजन यांनी केला. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लवकर झाली पाहिजे. असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

“अमिताभ बच्चन के सम्मान मे आरपीआय मैदान मे”

Exit mobile version