भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी मोठा दावा केला आहे. दिशा सालियानच्या मृत्यूबाबत नेमके काय झाले हे सत्य ७ मार्चनंतर बाहेर येईल. यामध्ये कोण गुंतले आहे आणि कोण तुरुंगात जाणार हे स्पष्ट होईल, असा खळबळजनक खुलासा त्यांनी केला आहे. कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दिशा सालियानच्या मृत्यूचे राजकारण होत असल्याचा आरोप एका पत्रकाराने निदर्शनाला आणला असता ते म्हणाले की, याबाबतीत काहीही राजकारण होत नाही. सात मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील, दूध का दूध आणि पानी का पानी होईल, कोण गुंतले आहे आणि कोणाला तुरुंगात जावे लागेल हे स्पष्ट त्या दिवशी स्पष्ट होणार आहे.
"घाबरू नका, दिशा सालियन प्रकरणात ७ मार्चनंतर…", चंद्रकांत पाटलांचा मोठा दावाhttps://t.co/GCVzHVnhkR#ChandrakantPatil #DishaSalian #Mumbai @ChDadaPatil
— LoksattaLive (@LoksattaLive) February 22, 2022
त्यांनी पुढे सांगितले की, महाविकास आघाडी सरकारचे नेते रांगेत आहेत. उत्तर प्रदेशात ७ मार्च रोजी शेवटचे मतदान झाले की, बहुधा कारवाई सुरू होईल. त्यातून पळता भुई थोडी होईल व त्यातून हे सरकार पडेल, असे आपले विश्लेषण आहे. असा अंदाज सामान्य माणूसही बांधू शकतो. महाविकास आघाडी पूर्णपणे शेतकरीविरोधी आहे. उसाचे एफआरपीचे पैसे दोन तुकड्यात देण्याचा या सरकारचा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करणारा आहे. यामुळे शेतकरी ऊसशेती सोडून देतील असा धोका आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी या निर्णयाविरोधात टोकाचा संघर्ष करणार आहे. असा दावा पाटील केला आहे.
हे ही वाचा:
उत्तराखंड: गाडी दरीत कोसळून १४ जणांचा मृत्यू
हर्षच्या हत्येनंतर विहिंप आणि बजरंग दल राज्यव्यापी आंदोलन करणार
मुख्यमंत्री महोदय, कळकळीची विनंती!!! यावेळी तरी मनाचा कोतेपणा दाखवू नका…
‘समीर वानखेडे बार परवाना प्रकरणाच्या सुनावणीसाठी घाई कशाला?’
तसेच महाविकास आघाडी सरकारने राजकारणासाठी सत्तेचा व पोलिसांचा दुरुपयोग चालविला आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांना पकडून पोलीस ठाण्यात नेणे आणि दबाव आणण्याचा प्रकार चालू आहे. असा आरोप महाविकास आघाडीवर पाटील यांनी केला आहे.