असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मोदी सरकारकडून ई-श्रम पोर्टल सुरु केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत ३ कोटी मजुरांनी नोंदणी केली आहे. मोदी सरकारने २६ ऑगस्ट २०२१ रोजी या योजनेची सुरवात केली होती.
“मोदी सरकारच्या ई-श्रम पोर्टलला मोठा प्रतिसाद, अवघ्या दोन महिन्यांत ३ कोटी कामगारांची नोंदणी केली गेली आहे. मोदी सरकारवरील गोरगरीब जनतेच्या अतूट विश्वासाचे हे प्रतीक आहे. हा कष्टकरी जनतेचा विश्वास हीच मोदी सरकारची खरी कमाई आहे.” असं ट्विट भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी केले आहे. त्याचबरोबर मोदी है तो मुमकिन है हा हॅशटॅगसुद्धा त्यांनी लिहिला आहे.
मोदी सरकारच्या e-Shram पोर्टलला मोठा प्रतिसाद, अवघ्या दोन महिन्यांत ३ कोटी कामगारांची नोंदणी केली गेली आहे.
मोदी सरकारवरील गोरगरीब जनतेच्या अतूट विश्वासाचे हे प्रतीक आहे. #ModiHaitoMumkinHai
… हा कष्टकरी जनतेचा विश्वास हीच मोदी सरकारची खरी कमाई आहे. pic.twitter.com/AkFpnMBzJY— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 10, 2021
ई-श्रम पोर्टल देशभरातील ३८ कोटीहून अधिक असंघटित कामगारांची मोफत नोंदणी करणार आहे. या कामगारांना सामाजिक सुरक्षा योजनांच्या वितरणासाठी मदत या पोर्टलमुळे मदत होईल. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी पदभार स्वीकारताच असंघटित क्षेत्रातील कामगारांचा डेटाबेस तयार करण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी ई-श्रम पोर्टल सुरू केले होते.
ई-श्रम पोर्टल पर पंजीकरण कराने वाले श्रमिकों की संख्या 3 करोड़ पार कर गयी है। इस पोर्टल पर पंजीकरण कराने से असंगठित क्षेत्र के श्रमिकों को सरकार की योजनाओं का लाभ सरलता और सुगमता से मिल सकेगा। pic.twitter.com/I3TLLMYtAc
— Bhupender Yadav (@byadavbjp) October 8, 2021
हे ही वाचा:
आरे वसाहतीत आता बिबट्यांपायी दुचाकीवरून फिरणेही मुश्कील
नवाब मलिकविरोधात १०० कोटींचा दावा करणार मोहित कंबोज
आशिष मिश्रा एसआयटीसमोर; आता वास्तव येईल समोर
ई-श्रम पोर्टल सुरू झाल्यानंतर असंघटित क्षेत्रातील कामगार त्याच दिवसापासून त्यांची नोंदणी सुरू करू शकतात. यासंदर्भातील संपूर्ण माहिती दिल्यानंतर कामगार स्वतःला ई-श्रम पोर्टलशी जोडू शकतात. यासाठी या पोर्टलच्या कार्यकर्त्याला जन्मतारीख, होम टाऊन, मोबाईल नंबर आणि सामाजिक श्रेणी यासारखी आवश्यक माहिती द्यावी लागेल. याशिवाय आधार कार्ड क्रमांक आणि बँक खात्याचा तपशील टाकावा लागेल. ही सर्व माहिती दिल्यानंतर कामगार स्वतःची नोंदणी करू शकतात.