उर्फी प्रकरणात तृप्ती देसाईंना वाटू लागला रस; उर्फीला हात लावूनच दाखवा!

उर्फी मुस्लिम असल्यामुळे तिला लक्ष्य करण्याचा प्रयत्न

उर्फी प्रकरणात तृप्ती देसाईंना वाटू लागला रस; उर्फीला हात लावूनच दाखवा!

उर्फी जावेद प्रकरणाला राजकीय रंग देण्याचे काम सुरू असताना आता त्यात तृप्ती देसाई यांनी आता या प्रकरणात रस घेतला आहे. त्यांनी यात उडी घेत उर्फीचे समर्थन केले आहे. एवढेच नव्हे तर यात जातीय कार्ड खेळण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे.

उर्फी ही मुस्लिम असल्यामुळे तिला लक्ष्य केले जात आहे का हे पाहावे लागेल, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. तिचे थोबाड रंगविण्याची भाषा केली जात आहे, पण तिला हात लावून दाखवावा, असे आव्हान तृप्ती देसाई यांनी दिले आहे.

उर्फी जावेदला पोलिसांनी नोटीस बजावली असून तिला आता यासंदर्भात जबाब नोंदवावा लागेल. त्यावर तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे की, आपला देश संविधानानुसार चालतो. उर्फी जावेदने कोणते कपडे घालावेत, कोणते घालू नयेत हा अधिकार तिला आहे. अनेक अभिनेत्री असे कपडे घालत असतात तेव्हा त्यांना कुणी प्रश्न विचारत नाही. त्यामुळे उर्फी जावेदला लक्ष्य करताना ती मुस्लिम आहे म्हणून लक्ष्य केले जात आहे का हे पाहावे लागेल.

हे ही वाचा:

राऊतांची रवानगी लवकरच तुरुंगात

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू -काश्मीरच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा

उद्धव गटाचाप्रवास आता ‘तेजस’ एक्स्प्रेसने

छोटा राजनचा वाढदिवस केला मोठा, पोलिसांचा पडला सोटा

तृप्ती देसाई यांनी प्रश्न विचारला आहे की, उर्फी जावेदविरोधातच ही कारवाई का? कंगना राणावत, मल्लिका शेरावत, दीपिका पदुकोण या अभिनेत्रीही अंगप्रदर्शन करतात. तरीही फक्त उर्फीला लक्ष्य केले जात असेल तर आम्ही उर्फीच्या सोबत आहोत.

तृप्ती देसाईंनी सत्तेचा हा दुरुपयोग असल्याचे म्हटले आहे. संविधानाने आम्हाला कोणते कपडे घालावेत हे निवडण्याचा अधिकार दिला आहे.

उर्फी जावेदच्या अंगप्रदर्शनावरून भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी मोहीम उघडली आहे. सार्वजनिक ठिकाणी तिने असे अंगप्रदर्शन करू नये, असे चित्रा वाघ यांचे म्हणणे आहे. त्याविरोधात त्यांनी राज्य महिला आयोगालाही साकडे घातले होते तसेच पोलिसात तक्रारही दाखल केली होती.

 

Exit mobile version