26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारणबारामतीत तुतारी घेतलेल्या माणसाविरुद्ध 'तुतारी'

बारामतीत तुतारी घेतलेल्या माणसाविरुद्ध ‘तुतारी’

शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे धाव

Google News Follow

Related

देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून निवडणुकीचा पहिला टप्पा यशस्वी पार पडला आहे. अशातच राज्यातील बारामती मतदारसंघ पुन्हा एकदा निवडणूक चिन्हामुळे चर्चेत आला आहे. यंदा बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार असून बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार, २२ एप्रिल रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात आली. यावेळी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाले आहे. तर, दुसऱ्या एका उमेदवाराला ‘तुतारी’ हे चिन्ह देण्यात आले आहे. यावरून आता शरद पवार गटाने नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय त्यांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.

लोकसभा निवडणूक चिन्ह वाटपात सोयल शहा युनूस शहा शेख या अपक्ष उमेदवाराला ‘तुतारी’ हे चिन्ह देण्यात आले आहे. यावरून शरद पवार पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. बारामती मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. बारामतीतील निवडणुकीसाठी एकूण ५० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची २० एप्रिलला पडताळणी झाली. यामध्ये ४६ अर्ज वैध ठरवण्यात आले होते. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बारामती मतदारसंघातून ३८ उमेदवार रिंगणामध्ये आहेत. या ३८ उमेदवारांना सोमवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले.

दरम्यान, बारामती मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या शेख यांनी चिन्हांच्या पहिल्या पसंती क्रमामध्ये ‘तुतारी’ या चिन्हाची मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून तुतारी हे चिन्ह देण्यात आले आहे. मात्र, या मतदारसंघातून सुप्रिया सुळे या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवत असल्याने तुतारी हे चिन्ह दुसऱ्या उमेदवारास दिल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याने शरद पवार गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

हे ही वाचा:

राजौरीत मशिदीच्या बाहेर दहशतवाद्यांचा गोळीबार; सैनिकाच्या भावाची गोळी झाडून हत्या!

केक खाल्ल्याने मुलीचा मृत्यू; पंजाबच्या बेकरीतील केकमध्ये सिंथेटिक स्वीटनरचे अधिक प्रमाण!

‘पराभवानंतर मला जिंकू असे वाटले होते’

परेड सरावादरम्यान मलेशियन नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची टक्कर; १० जणांचा मृत्यू

दरम्यान, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितले की, “केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राला वाटप केलेली चिन्हे आहेत. या चिन्हांबाबत काही आक्षेप असल्यास त्यावर जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मला निर्णय घेता येणार नाही. केंद्रीय निवडणूक आयोगच याबाबतचा निर्णय घेईल.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा