खडसे यांची ही संपत्ती केली ईडीने जप्त

खडसे यांची ही संपत्ती केली ईडीने जप्त

ईडीकडून मोठी कारवाई

भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ईडीने खडसे यांची लोणावळा आणि जळगावमधील मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई करत ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी ईडीकडून केली जात होती. एका प्रकरणात खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता एकनाथ खडसेंवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

एकनाथ खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात एकनाथ खडसेंची चौकशी केली जात असतानाच ही कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

… तर आंदोलनाला सामोरं जा

जुनी वाहने भंगारात काढणे का गरजेचे आहे?

सरसंघचालकांनी घेतले भगवान जगन्नाथाचे दर्शन, गोवर्धन पिठाच्या शंकराचार्यांशीही भेट

लीड्स कसोटीत इंग्लंड मजबूत स्थितीत

ईडीच्या आरोपानुसार २०१६ मध्ये महसूलमंत्री असताना खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील एक भूखंड विकत घेतला. या भूखंडाचा बाजारभाव ३१ कोटी रुपये असताना गिरीश यांनी तो अवघ्या तीन कोटी रुपयांना विकत घेतला. हा भूखंड एमआयडीसीच्या मालकीचा होता. इतक्या कमी किंमतीत व्यवहार कसा काय झाला? गिरीश यांनी तो विकत घेण्यासाठी गोळा के लेल्या तीन कोटी रुपयांचा स्रोत काय? या मुद्यांवर ‘ईडी’चा तपास सुरू केला होता.

या प्रकरणातील गैरव्यवहाराशी चौधरी यांचा थेट संबंध आहे. त्यासंदर्भात पुढील तपास आणि पुरावे गोळा करण्यासाठी तसेच इतर महत्वाच्या चौकशीसाठी चौधरी यांच्या कोठडीत आणखीन तीन दिवसांची वाढ देण्यात यावी, अशी मागणी ईडीच्यावतीने न्यायालयात करण्यात आली. मात्र त्यांची ही मागणी अमान्य करत न्यायालयानं चौधरी यांच्या ईडी कोठडीत केवळ आणखीनं एका दिवसाची वाढ केली.

Exit mobile version