त्रिपुराचे मुख्यमंत्री बदलणार! विपलब देब यांचा राजीनामा

त्रिपुराचे मुख्यमंत्री बदलणार! विपलब देब यांचा राजीनामा

त्रिपुराच्या राजकारणाच्या दृष्टीने एक मोठी घडामोडी घडली आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री विपलब देब यांनी राजीनामा दिला असून त्रिपुरा राज्याला आता नवे मुख्यमंत्री लाभणार आहेत. शनिवार, १४ मे रोजी अचानकपणे त्रिपुराचे मुख्यमंत्री विपलब देब यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले. तर आजच संध्याकाळी त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री कोण असणार त्याचा फैसला होणार आहे. असे असले तरी भारतीय जनता पार्टी कडून विपलब देब यांना बदलण्याचा निर्णय घेण्यात आला याचे मुख्य कारण अद्यापही समोर आलेले नाही.

पुढल्या वर्षी २०२३ मध्ये त्रिपुरामध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे मुख्यमंत्री बदलाचा पॅटर्न त्रिपुरामध्येही राबवण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतो. त्रिपुराचे मुख्यमंत्री बदलून नवे मुख्यमंत्री निवडण्याच्या सर्व प्रक्रियेच्या देखरेखीसाठी केंद्रातून मंत्री भूपेंद्र यादव आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे या दोघांना निरीक्षक म्हणून पाठवण्यात आले आहे. त्यामुळे भाजपा आता त्रिपुराची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर सोपवण्यात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

चारधामचे व्हीआयपी दर्शन आता बंद

सह्याद्रीचा कडा, श्वास रोखूनी खडा! आला सरसेनापती हंबीररावचा जबरदस्त ट्रेलर

केतकी चितळेला पोलिसांनी घेतले ताब्यात

“हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी अकबरुद्दीनचे दात पाडावे”

२०१८ साली भारतीय जनता पार्टीने गेल्या अनेक दशकांच्या कम्युनिस्ट सरकारला खाली खेचत त्रिपुरात सत्ता स्थापन केली. त्यानंतर विपलब देब यांना मुख्यमंत्री नियुक्त करण्यात आले. पण आता त्रिपुराच्या निवडणुकांना वर्षभरापेक्षाही कमी कालावधी शिल्लक असताना मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे.

Exit mobile version