पश्चिम बंगालमधील मतदानादरम्यान तृणमूल काँग्रेसने एक छायाचित्र सादर करून ईव्हीएमवर भाजपचा टॅग असल्याचा दावा केला होता. बांकुरामध्ये एका ईव्हीएमवर भाजपचा टॅग होता, असा दावा करण्यात आला. ‘ममता बॅनर्जी यांनी वारंवार याबाबत कळवले आहे, भाजप ईव्हीएमवर गडबड करून मतांमध्ये फेरफार करण्याच्या प्रयत्नात आहे. आज बांकुराच्या रघुनाथपूर येथे पाच ईव्हीएम आढळले, ज्यावर भाजपचा टॅग लावलेला होता,’ असे तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे. यावर निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे.
निवडणूक आयोगाच्या मते, हा कॉमन ऍड्रेस टॅग आहे. ज्यावर उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी स्वाक्षरी करतात. कमिशनिंग हॉलमध्ये तेव्हा केवळ भाजपच्या उमेदवाराचे प्रतिनिधी उपस्थित होते, अशा परिस्थितीत त्यांची स्वाक्षरी येथे घेण्यात आली. पोलिंग स्टेशन क्रमांक ५६, ५८, ६०, ६१, ६२वर सर्व उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचे कठोरपणे पालन केले जात आहे. ईव्हीएमची कमिशनिंग सीसीटीव्हींच्या माध्यमातून देखरेख ठेवली जाते. तसेच, स्वतंत्रपणेही याचे चित्रिकरण केले जाते. सहाव्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील आठ लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये १८ जागा जिंकल्या होत्या. तर, तृणमूल काँग्रेसने या गमावलेल्या जागा परत मिळवण्याचा चंग बांधला आहे.
हे ही वाचा:
राजस्थानमध्ये उष्णतेचे ‘अर्धशतक’; फलोदीत ५० अंश तापमान
आयुष्यभर गटातटाचं राजकारण करणाऱ्या राऊतांना ‘भाजपचा परिवार’ काय कळणार!
केंद्रीय निवडणूक आयोग म्हणतो, मतदानाच्या आकडेवारीत फेरफार अशक्य!
‘ठाकरे’ राऊतांवर भडकले…गडकरींबद्दलच्या वक्तव्यावरून नाराजी!
या आठ लोकसभा मतदारसंघात फॅशन डिझायनर आणि आता राजकीय नेत्या बनलेल्या अग्निमित्रा पॉल, कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय आणि तृणमूलचे देबांशू भट्टाचार्य रिंगणात आहेत.