काँग्रेस लढून थकला आहे; तृणमूल हीच खरी काँग्रेस   

काँग्रेस लढून थकला आहे; तृणमूल हीच खरी काँग्रेस   

तृणमूल काँग्रेसकडून सातत्याने काँग्रेसवर टीका केली जात आहे. तृणमूलने आपल्या मुखपत्रातून काँग्रेसला ‘थकलेले’ म्हटले आहे. तृणमूलने आपल्या मुखपत्रात म्हटले आहे की, त्यांची स्थिती ही युद्ध लढून थकलेल्यांसारखी आहे. मुख्य विरोधी पक्ष म्हणून संसदेत जे करणे अपेक्षित आहे ते करण्यास अपयशी ठरल्याचे ‘जागो बांगला’मध्ये लिहिले आहे.

तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये विजय नोंदवला. मात्र, काँग्रेस आता लढून थकला आहे, असा आरोप मुखपत्रातून करण्यात आला आहे. त्यामुळेच हा पक्ष आता विखुरला असून अंतर्गत कलहाचा सामना करत आहे. मुखपत्राने असाही दावा केला आहे की, आता तृणमूलने भाजप विरोधात प्रमुख विरोधी पक्षाची जागा घेतली आहे आणि तृणमूल हीच खरी काँग्रेस आहे.

हे ही वाचा:

मोदींनी बोलवली महत्वाची सुरक्षा विषयक बैठक

पाकिस्तानमध्ये महिलांविरुद्ध तालिबानी अत्याचार

अमरिंदर सिंग- शेखावत चर्चेत युतीवर चर्चा?

अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियाचाही चीनच्या ऑलिंपिकवर बहिष्कार

गेल्या काही दिवसांपासून तृणमूल विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे. तृणमूल हा बंगालपासून गोवा, मेघालय, त्रिपुरा हरियाणापर्यंत विस्तारत आहे. काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्राचा दौरा करून महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना नेते आणि राष्ट्रवादी नेत्यांशी चर्चा केली होती.

Exit mobile version