23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामा“शाळा भरती घोटाळ्याबद्दल तृणमूलला निवडणुकीपूर्वीच सर्व माहित होते”

“शाळा भरती घोटाळ्याबद्दल तृणमूलला निवडणुकीपूर्वीच सर्व माहित होते”

टीएमसीने हकालपट्टी केलेले नेते कुणाल घोष यांचा दावा

Google News Follow

Related

तृणमूल काँग्रेसने बुधवार, १ मे रोजी नेते कुणाल घोष यांची पक्षाच्या सरचिटणीस पदावरून हकालपट्टी केली होती. अलीकडच्या काळातील त्यांचे विचार हे पक्षाच्या विचारधारेशी जुळत नाहीत, असं म्हणत पक्षाने त्यांना सरचिटणीस पदावरून काढून टाकले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये तृणमूलमध्ये राजकीय गोंधळ उडाला आहे. त्यांची महत्त्वाच्या पदावरून हकालपट्टी होताच त्यांनी पक्षाविरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे.

तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुणाल घोष यांना टीएमसीने सरचिटणीसपदावरून अचानक हटवले. ममता बॅनर्जी यांच्या पक्षात एकेकाळी महत्त्वाच्या असलेल्या कुणाल घोष यांना अचानक काढून टाकण्यात आल्याने प्रश्न उपस्थित होत असतानाच त्यांनी पक्षाविरोधातही तोंड उघडण्यास सुरुवात केली आहे. कुणाल घोष यांनी दावा केला की, २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीचं पक्षाला शाळा भरती घोटाळ्याबद्दल सर्व काही माहित होते.

हे ही वाचा:

दिल्ली, नोएडामधील शाळांना आलेल्या धमकीच्या ईमेलपाठी आयएसआयचा हात?

अमित शाह एडिटेड व्हिडीओ प्रकरणी ‘एक्स’कडून झारखंड काँग्रेसचे अकाऊंट बंद

‘देशातील संकटकाळी इटलीला पळून जाणाऱ्यांनी तिकडूनच निवडणूक लढवावी’

सिद्धू मूसवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या?

टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या जवळचे मानले जाणारे घोष यांचे हे धक्कादायक विधान सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आले आहे कारण एसएससी घोटाळा या निवडणुकीत एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. कुणाल घोष यांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) लोकसभा उमेदवारासोबत स्टेज शेअर केला होता. एवढेच नाही तर त्यांनी मंचावरून भाजप उमेदवाराचे कौतुक केले, त्यानंतर काही तासांनी त्यांना पदावरून हटवण्यात आले. तृणमूल काँग्रेसमध्ये पदावरून हटवल्यानंतर एका बंगाली वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पक्षावर निशाणा साधला. कुणाल घोष म्हणाले की, शालेय शिक्षण विभागात नोकऱ्यांच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि खंडणी होत असल्याचे पक्षाला चांगलेच ठाऊक आहे. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच पक्षाला याची जाणीव होती. २०२१ मध्ये पक्ष सलग तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर आणि भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर पार्थ चॅटर्जी यांची उद्योग विभागातून शिक्षण मंत्रालयात बदली करण्यात आली, असा दावा त्यांनी केला. या प्रकरणात, टीएमसी नेतृत्वाने म्हटले होते की २०२२ मध्ये चटर्जी यांना अटक होईपर्यंत पक्षाला या घोटाळ्याची माहिती नव्हती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा