तृणमूल काँग्रेसचा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय

तृणमूल काँग्रेसचा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय

राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीनंतर आता उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणुक होणार आहे. भाजपाने पश्चिम बंगालचे राज्यपाल जयदीप धनकड यांना उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. तर विरोधी पक्षांकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे निवडणुकी अगोदरच विरोधी पक्षांमध्ये फूट पडल्याच्या चर्चा सुरु आहेत. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करणार नसल्याचे जाहीर केले आहे. उमेदवार निवडताना आम्हाला विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

येत्या ६ ऑगस्टला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. जयदीप धनकड आणि मार्गारेट अल्वा यांच्यामध्ये ही लढत होईल. एनडीएचे उमेदवार जयदीप धनकड हे विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मात्र, निवडणुकी अगोदरच विरोधी पक्षांमध्ये फूट पडल्याने अल्वा यांच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

बजरंग दलाने कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयावर लिहिले हज हाऊस

चीनमध्ये बँकिंग संकट; नागरिकांना रोखण्यासाठी बँकांसमोर रणगाडे तैनात

पंतप्रधान मोदींनी घेतली द्रौपदी मुर्मू यांची भेट

द्रौपदी मुर्मू यांच्या विजयासाठी वीस हजार लाडू तयार

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत देशभरातील एकूण १७ खासदारांची मतं फुटली. या खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान केले. परिणामी मुर्मू शेवटपर्यंत आघाडीवर राहिल्या आणि त्यांचा विजय झाला. तसेच द्रौपदी मुर्मू या आता भारताच्या १५व्या आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. शिवाय, पहिल्या आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपती म्हणूनही त्यांना सन्मान मिळाला आहे.

Exit mobile version