“पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या अस्तित्वाची लढाई”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत देताना केला मोठा दावा

“पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या अस्तित्वाची लढाई”

लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले असून आता केवळ अंतिम टप्पा बाकी आहे. अशातच शेवटच्या टप्प्यासाठी आता प्रचार सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत देताना मोठा दावा केला आहे. “तृणमूल काँग्रेस पक्ष पश्चिम बंगालमधील निवडणुकीत अस्तित्वासाठी लढत आहे आणि भाजपासाठी सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य पश्चिम बंगाल असेल,” असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.

“गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही ३ होतो आणि पश्चिम बंगालच्या लोकांनी आम्हाला ८० वर नेले. गेल्या निवडणुकीत आम्हाला प्रचंड बहुमत मिळाले. यावेळी संपूर्ण देशात पश्चिम बंगाल हे सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य असेल. पश्चिम बंगालमध्ये भाजपला सर्वाधिक यश मिळत आहे. तेथे निवडणूक एकतर्फी आहे,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.

दरम्यान, मुस्लिमांसाठी ओबीसी कोट्याबाबतचा कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया यावर बोलताना पीएम मोदी यांनी ममतांवर व्होट बँक राजकारण केले जात असल्याचा आरोप केला. जेव्हा कोलकाता उच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर एवढी मोठी फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले. पण त्याहून दुर्दैवी गोष्ट म्हणजे व्होट बँकेच्या राजकारणासाठी आता ते न्यायव्यवस्थेचाही दुरुपयोग करत आहेत. ही अशी परिस्थिती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह असू शकत नाही, अशी टीका नरेंद्र मोदी मोदी यांनी केली आहे.

हे ही वाचा:

एनआयएची मोठी कारवाई; परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी उध्वस्त

ब्रिटनमध्ये आता प्रत्येकाला व्हावे लागेल लष्करात भर्ती

‘केजरीवाल संधीसाधू, दिग्विजय अनुभवशून्य’

पराभवाचे खापर भाऊ-बहिणींवर नाही, तर तुमच्यावर फुटणार.. खर्गे साहेब तुमची नोकरी जाणार!

ओडिशाबद्दल भाष्य करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “ओडिशाचे भाग्य बदलणार आहे. तिथले सरकार बदलेल. सध्याच्या ओडिशा सरकारची मुदत ४ जून रोजी संपत आहे. ओडिशात १० जून रोजी भाजपाचा मुख्यमंत्री शपथ घेईल.” असा दावाही मोदींनी केला आहे.

“२४ वर्षांपासून विरोधकांची शिवीगाळ ऐकून ‘गाली प्रूफ’ झालोय”

मुलाखतीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “मला कुणी मौत का सौदागर म्हटले तर कुणी गंदी नाली का किडा. संसदेत आमच्या एका सहकाऱ्याने १०१ अपशब्द माझ्यासाठी वापरले होते. त्यामुळे निवडणुका असो वा नसो, हे लोक मानतात की, त्यांना शिवीगाळ करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ते वैतागले आहेत. सातत्यानं अपशब्द वापरणं त्यांच्या स्वभाव बनला आहे,” असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला आहे. विरोधक माझ्यावर गेल्या २४ वर्षांपासून शिवीगाळ करत असून आता मी ‘गाली प्रूफ’ झालो आहे, अशी सणसणीत चपराक नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावली आहे.

Exit mobile version