पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात अंदाजे २५ झाडांची कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या लोअर परेल भागात ही घटना घडली असून या झाडांची कत्तल अतिशय शुल्लक कारणावरून करण्यात आल्याचा आरोप लोअर परेल मधल्या पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केला आहे.
शनिवार, ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. आपले पर्यावरण प्रेम दाखवायला कायम उत्सुक असणारे महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विविध वृत्तपत्रात पानभर जाहिराती देत या दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण पर्यावरण दिनाच्या आदल्याच दिवशी आदित्य ठाकरे हे ज्या मतदारसंघातून निवडून येतात त्या वरळी मतदारसंघातील भागात अंदाजे २५ झाडांची कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
हे ही वाचा:
चित्रिकरणासाठी निर्बंध उठले परंतु प्रश्नचिन्ह कायम
भारत, अमेरिका, चीनला मिळाल्या ६० टक्के लसमात्रा
महाराष्ट्रात कोरोना मृतांची संख्या १ लाखांच्या पुढे
लोअर परेल रेल्वे स्टेशन परिसरातील होर्डिंग्स नीट दिसावेत यासाठी ही झाडे तोडण्यात आल्याचा आरोप स्थानिक पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केला आहे. लोअर परेल रेल्वे स्थानकाच्या परिसरात जाहिरातीचे कहाणी होर्डिंग्स आहेत. या परिसरातील वाढलेल्या वृक्षांमुळे हे होर्डिंग्स नीट दिसत नाहीत. त्यामुळेच या झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. तर ही झाडे तौक्ते चक्रीवादळात पडल्याचे भासवले जात आहे असेही स्थानक नागरिकांचे म्हणणे आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे कायमच आपल्याला पर्यावरणाविषयी किती आपुलकी आहे हे भासवत असतात. याचे राजकीय भांडवल करून मेट्रो सारख्या विकास कामांना विरोध करतानाही महाराष्ट्राने त्यांना पहिले आहे. पण आता राज्यात आणि मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना शुल्लक कारणावरून त्यांच्याच मतदारसंघात होणाऱ्या झाडांच्या कत्तलीवर त्यांनी सोयीस्कर मौन बाळगले आहे.