महाराष्ट्र पोलीस दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली आणि पदोन्नतीचे बुधवार, २० एप्रिल रोजी आदेश काढण्यात आले होते. मात्र त्याला बारा तासही उलटले नसताना पाच अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
वसुली रॅकेटमुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, वसुलीचा भाग म्हणून अधिकारांच्या बदल्या केल्यात का? तसेच काही तासातच या बदलीच्या आदेशाला का स्थगिती दिली? हा सगळा प्रकार समोर आला पाहिजे, असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.
पोलखोल रथाच्या तोडफोडीबद्दल फडणवीस म्हणाले, ज्यांची पोलखोल होत आहे, ते अस्वस्थ होऊन तोडफोड करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी जर त्यांना पाठींबा दिला तर त्यांचीदेखील पोलखोल होईल असा, इशारा फडणविसांनी दिला आहे.
आगामी निवडणुकीसाठी नेते संजय राऊत आणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे फडणविसांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करत म्हणाले, जर संजय राऊत नागपूरला आले तर त्यांना सुबुद्धी येईल अशी खोचक टीका त्यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले, अमरावती जिल्ह्यात पोलीसांचे राज्य इंग्रजांसारखे झाले आहे, जे ते बोलतील तेच होत आहे. हिंदू समाजाला लक्ष्य केले जात आहे त्यामुळे दोन समाज एकमेकांसमोर आले आहेत.
हे ही वाचा:
खंडणी मागणाऱ्या महिलेला मुंडेंनी दिला महागडा मोबाईल आणि ३ लाख
दिल्लीत भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या
…म्हणून अक्षय कुमारने मागीतली चाहत्यांची माफी
अबब! मविआच्या मंत्र्यांनी स्वतःवरील उपचारासाठी किती खर्च केला बघा?
दरम्यान, भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही गृहखात्याच्या कारभारावरून प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,” अजब सरकारची गजब कहाणी आहे. राज्याला वळसे पाटलांच्या रुपात एक नामधारी गृहमंत्री लाभले आहेत. ज्यांचे कोणी ऐकत नाही, कुणीही उठतं आणि त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त करते. काही कार्यकारी गृहमंत्री आहेत, ज्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड आपण बघितलेत, जे फोनवर आदेश देतात. तर काही अदृश्य गृहमंत्री आहेत, ज्यांच्यामुळे पोलिसांचे राजकीयीकरण सुरू आहे.”