ठाण्यातील ट्रॅफिक वॉर्डनचे तब्बल पंधरा महिन्यांचे पगार अखेर देऊन पूर्ण करण्यात आले आहेत. जुलै २०२० ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत शिवसेना शासित ठाणे महापालिकेने हे पगार थकवले होते. ठाण्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नांनी ही थकबाकी ट्रॅफिक वॉर्डनना मिळाली आहे.
ठाण्यामध्ये ट्रॅफिक पोलिसांना मदत करण्यासाठी ट्रॅफिक वार्डन काम करतात. या ट्रॅफिक वॉर्डनचे पगार हे ठाणे महापालिकेच्या मार्फत दिले जातात. पण या ट्रॅफिक वॉर्डनचे जुलै २०१९ पासूनचे पगार शिवसेनेच्या ठाणे महापालिकेमार्फत थकवण्यात आले होते. तरी हे ट्रॅफिक वॉर्डन आपले काम प्रामाणिकपणे करत होते. कोरोनाच्या कठीण काळातही त्यांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. पण तरीही ठाणे महापालिकेतर्फे त्यांचे थकीत पगार दिले गेले नव्हते.
हे ही वाचा:
ज्येष्ठ लेखक, नाट्य समीक्षक जयंत पवार यांचे निधन
संजय राऊत हे साधे नगरसेवकही नाहीत
२०५० मध्ये मुंबई बुडणार? मंत्रालय, नरिमन पॉइंट जाणार पाण्याखाली
धुरंधर ढेपाळले, भारताचा दारुण पराभव
ठाणे महापालीकेने जुलै २०१९ ते ऑक्टोबर २०२० या काळातील पगार एक वर्ष उलटून सुद्धा दिलेला नव्हता. हा पगार अडकून राहण्याचे मुख्य कारण पालिकेत चालणारी टक्केवारी असल्याचे आरोप होत होते. हे माहिती मिळताच आमदार संजय केळकर यांनी ठामपा आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांशी बैठका करून पाठपुरावा केला. यानंतर आता सर्व कर्मचाऱ्यांचा थकीत पगार देण्यात आला आहे. ३८ लाख इतकी या पगाराची रक्कम असून संजय केळकर यांनी ते मिळवून दिल्याबद्दल या ट्राफिक वॉर्डन यांनी आमदार केळकरांचे आभार व्यक्त केले.