22 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरराजकारणमुंबईतील व्यापाऱ्यांनी मांडले राज्यपालांसमोर गाऱ्हाणे

मुंबईतील व्यापाऱ्यांनी मांडले राज्यपालांसमोर गाऱ्हाणे

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी समुदायाचे कंबरडे मोडले असून यापुढे हे सहन केले जाणार नाही असा इशारा भाजपा मुंबई कडून देण्यात आलेला आहे. राज्यात पसरलेल्या कोविडच्या पार्श्वभूमीवर एकीकडे ठाकरे सरकारने लॉकडाऊन वाढवलेला असताना, ह्या लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांना सवलती देण्यात याव्यात या मागणीसह व्यापार्‍यांचे शिष्टमंडळ महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटले. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. यावेळी या व्यापाऱ्यांनी आपल्या व्यथा राज्यपालांसमोर मांडल्या आहेत.

देशात कोविडची दुसरी लाट आली असून याचा फटका प्रत्येक क्षेत्रालाच बसलेला दिसत आहे. कोविड व्यवस्थापनात सपशेल अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारने महाराष्ट्रात लॉकडाऊन लावला असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. व्यापारी वर्गाला याची झळ बसली आहे. अनेक छोटे-मोठे उद्योग हे या लॉकडाऊनमुळे बंद पडलेले पाहायला मिळत आहेत. देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईतही व्यापारी वर्ग सततच्या लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेला दिसत आहे. शनिवार, २९ मे रोजी मुंबईतील व्यापारी वर्गाच्या प्रतिनिधींनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मंगल प्रभात लोधा यांच्या नेतृत्वात ही भेट झाली.

हे ही वाचा:

ऑक्सिजन एक्सप्रेसने पोहोचवला २०,००० मॅट्रिक टनपेक्षा अधिक ऑक्सिजन

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विज्ञाननिष्ठतेची देशाला गरज अधिक- जयंत नारळीकर

बनावट ओळखपत्राच्या आधारे अभिनेत्रीचे लसीकरण

कोविडमुळे निराधार झालेल्या मुलांसाठी सरसावले मोदी सरकार

यावेळी व्यापारी समुदायाने राज्यपालांसमोर आपल्या मागण्या ठेवल्या असून १ जून पासून व्यापाऱ्यांना अंशतः दुकाने उघडण्याची परवानगी मिळावी अशी मागणी यावेळी राज्यपालांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यपाल या मागणीला घेऊन ठाकरे सरकार समोर प्रस्ताव मांडतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या भेटीसाठी भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासोबतच मुंबई भाजपाचे सचिव आणि शिक्षण समिती सदस्य प्रदीप कर्पे, गुजराती आघाडीचे प्रमुख संजीव भाई पटेल, रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन भाई शहा, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष विनेश भाई मेहता, भाजपा उद्योग आघाडीचे प्रमुख जयेश जरीवाला, चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रियल ट्रेडचे प्रमुख मोहन भाई गुरनानी, अखिल भारतीय खाद्य तेल व्यापारी संघाचे प्रमुख शंकर भाई ठाकेर, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे ज्येष्ठ उपाध्यक्ष जितु भाई हे उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा