कंगनाचे सर्व पुरस्कार परत घ्या, संजय राऊतांची मागणी

कंगनाचे सर्व पुरस्कार परत घ्या, संजय राऊतांची मागणी

सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना रानौत ही तिने केलेल्या तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बॉलीवूड अभिनेत्री टाइम्स नाऊ समिट २०२१ मध्ये बोलत असताना, तिने स्वातंत्र्य लढ्याबद्दल वक्तव्य केले आणि सांगितले की, “भारताला १९४७ मध्ये ‘भीक’ (भिक्षा) म्हणून स्वातंत्र्य मिळाले आणि ‘खरे स्वातंत्र्य’ २०१४ मध्ये आले.” यावरूनच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनीही कंगनाने देशाचा अपमान केला असल्याचे म्हटले आहे.

कंगनाच्या वक्तव्याचा आम्ही धिक्कार करतो. कंगनाने देशाचा अपमान केला असून लाज लज्जा असेल तर तिने त्याबद्दल माफी मागावी, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांनी कंगनाचा उल्लेख कंगनाबेन असा केला आहे. कंगनाने देशाचा, स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. कंगनाचे सर्व पुरस्कार परत घ्या, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

हे ही वाचा:

 गुजरातमध्ये हस्तगत केलेल्या ३०० कोटींच्या ड्रग्सचे मुंब्रा कनेक्शन

पाकिस्तानला ‘वेड’ लागायचेच राहिले बाकी…

‘अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतात’

सलमान खुर्शीद यांनी पुन्हा उधळली मुक्ताफळं

कंगनाला ८ नोव्हेंबर रोजी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तिने केलेल्या वक्तव्यानंतर अनेकांनी ‘भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान’ केल्याबद्दल तिच्यावर टीका केली असून काहींनी तर तिला मिळालेला पद्मश्री पुरस्कार परत घेतला पाहिजे, अशी मागणी केली आहे.

Exit mobile version