पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलह शिगेला हाच काँग्रेसच्या पराभवाचे कारण ठरेल असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. पंजाबचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्रं लिहिलं आहे. पंजाबच्या राजकारणात जबरदस्तीने हस्तक्षेप करू नका, नाहीतर पक्षालाच हानीकारक ठरेल, असा इशारा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधी यांना दिला आहे.
काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू शुक्रवारी सोनिया गांधींना भेटले. त्यानंतर सिद्धूंच्या निवासस्थानी संध्याकाळी त्यांच्या समर्थकांची गर्दी झाली. काहींनी तर सिद्धूंना गुच्छ देऊन शुभेच्छाही दिली. त्यामुळे सिद्धू यांना अमरिंदर मंत्रिमंडळात मोठं मंत्रिपद किंवा प्रदेशाध्यक्षपद मिळणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. काँग्रेसचे पंजाबचे प्रभारी हरीश रावत यांनीही सिद्धू यांना पंजाबचे प्रदेशाध्यक्ष बनवलं जाऊ शकतं, असं एका मुलाखतीत जाहीर केलं होतं. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग यांनी थेट सोनिया गांधींना पत्रं लिहून निर्वाणीचा इशारा देणारं पत्रंच लिहिलं.
काँग्रेस हायकमांडने जबरदस्ती पंजाब सरकार आणि पंजाबच्या राजकारणात हस्तक्षेप करू नये. पंजाबची परिस्थिती अनुकूल नाही, हे हायकमांडला समजलं पाहिजे. त्याचं पक्ष आणि संघटनेचा नुकसान होऊ शकतं, असं अमरिंदर सिंग यांनी या पत्रात म्हटलं आहे. जुन्या नेत्यांकडे दुर्लक्ष करणं योग्य होणार नाही. त्याचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, असं सांगत अमरिंदर सिंग यांनी थेट नवज्योत सिंग यांच्या प्रदेशाध्यक्ष बनण्यास विरोध केला आहे.
हे ही वाचा:
लोणकरच्या कुटुंबियांनाच घ्यावी लागली मुख्यमंत्र्यांची भेट
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकाची हत्या
“मिल जाएँगे हर मोड़ पर गड्ढे-तालाब”
पंतप्रधान मोदींनी केले रोबोटिक्स आणि ॲक्वेटिक्स गॅलरीचे लोकार्पण
दरम्यान, हरीश रावत हे अमरिंदर सिंग यांची भेट घेणार असून सिद्धूंसोबतच्या वादावर तोडगा काढणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पंजाबमध्ये नेमकं काय होणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.