राज्यातील मनसुख हिरेन, अंबानींच्या घरासमोरील स्फोटकांचे प्रकरण आणि त्यातच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेला लेटरबॉम्ब याचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब मुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांची तर खुर्चीच धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली आहे.
आज दुपारी चार वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी, वर्षा बंगल्यावर विधी आणि न्याय मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकिय नाट्याचा कोणता अंक आता लिहीला जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हे ही वाचा:
इतक्या महत्वाच्या प्रकरणाचे खुलासे फेसबुकवर कधीपासून?
एकीकडे ही बैठक होणार असतानाच जयंत पाटील, अजित पवार आणि अनिल देशमुख यांची देखील बैठक होणार आहे. तर जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे इतर नेते यांची देखील बैठक होणार आहे.
त्याशिवाय महाविकास आघाडीतील तिनही पक्षांच्या नेत्यांची देखील बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर होऊ घातलेल्या या बैठकांकडे राज्याचे लक्ष निश्चितच लागले आहे.
त्यामुळे एकंदरीत आज महाराष्ट्रात बैठकांचा सिलसिला सुरू होणार असल्याची चिन्हे आहेत. या बैठकांमधून काय निष्पन्न होणार यावर देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.