महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज म्हणजेच रविवार, ८ ऑगस्ट रोजी राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. रात्री ८ वाजता समाज माध्यमांवरून मुख्यमंत्री लाईव्ह असणार आहेत. त्यामुळे आज मुख्यमंत्री नेमके कोणत्या विषयांवर बोलणारा आणि जनतेच्या खांद्यावर कोणती नवी जबाबदारी टाकणार याकडे साऱ्या राज्यातील लोकांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही काळात महाराष्ट्रात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र पट्टयातील अनेक गावांना पावसाचा आणि पुराचा फटका बसला आहे. ही गावे अजूनही या तडाख्यातून सावरलेली नाही. कोरोनाच्या निर्बंधांमुळे व्यापारी, व्यावसायिक त्रस्त आहेत, मुंबई आणि उपनगर भागात निर्बंध शिथिल केले असले तरी देखील मुंबईची जीवन वाहिनी अर्थात मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आलेली नाही. या सर्व प्रकारांमुळे नागरिक नुसते त्रस्तच नाहीत तर सरकारवर चिडलेले आहेत.
हे ही वाचा:
लोकलबंदीमुळे बेस्टने उचलला प्रवाशांचा भार
जम्मू- काश्मिरमध्ये अनेक ठिकाणी एनआयएची छापेमारी
…आणि धाडसी पत्रकारितेचा डांगोरा पिटणाऱ्या एनडीटीव्हीची उडाली भंबेरी
त्यामळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजच्या लाईव्ह संवादाच्या माध्यमातून त्रस्त जनतेला काही दिलासा देणारी घोषणा करणार का? तसा एखादा महत्त्वाचा निर्णय ठाकरे सरकार घेणार का? असा सवाल विचारला जात आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे पुन्हा एकदा राज्याच्या जनतेवर कोणती नवी जबादारी टाकणार का? या विचारानेही घाम फुटत आहे. या आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविडच्या काळात ‘माझे कुटुंब, माझे जबाबदारी’ अथवा ‘मी जबादार’ असे म्हणत राज्याच्या जनतेवर सगळी जबाबदारी ढकलली होती. त्यामुळे आता पुन्हा तसेच काहीसे होणार का? हा सवाल विचारला जात आहे.