पंतप्रधान मोदी साधणार अनाथ मुलांशी संवाद

पंतप्रधान मोदी साधणार अनाथ मुलांशी संवाद

कोरोना महामारीत ज्या मुलांचे पालक मृत्यू पावले, त्या मुलांना केंद्र सरकार अनेक सुविधा देत आहे. बिहारमध्ये महामारीत अनाथ झालेल्या मुलांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मे रोजी संवाद साधणार आहेत. यावेळी पटणामधील स्थानिक आमदार, खासदारही उपस्थित राहणार आहेत. या मुलांना अनाथ नसल्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न या संवादातून पंतप्रधान मोदी करणार आहेत. त्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी पालकांप्रमाणे पार पाडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

३० मे रोजी पंतप्रधान मोदी, अनाथ मुलांसाठी कोणत्या योजना चालवल्या जातात हे पंतप्रधान मोदी सांगणार आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या डीएमला अल्पवयीन मुलांचे पालक बनवण्यात आले आहे. १८ वर्षांपर्यंत या मुलांचे पालनपोषण डीएमच्या देखरेखीखाली केले जाणार आहे. पीएम केअर फॉर चिल्ड्रन अंतर्गत पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्यात आले आहे. अठरा वर्षांपर्यंत या मुलांच्या खात्यात १० लाख रुपये जमा होणार आहेत. बिहार राज्यात ७३ मुले कोरोनामुळे अनाथ झाली आहेत. यामध्ये पटणा जिल्ह्यातील ९ मुले आहेत. या मुलांची संपूर्ण जबाबदारी सरकार पार पाडणार आहे.

हे ही वाचा:

स्टार्टअप्समध्ये भारताची सेंचुरी; युनिकॉर्नची संख्या १०० वर

अनिल परबांनी मुरुड ग्रामपंचायतीला लिहिलेलं पत्र ईडीच्या हाती

‘रोहित पवारांनी असले धंदे बंद करावेत’

…तर १९४७ची परिस्थिती पुन्हा निर्माण होईल!

याबाबत समाज कल्याण संचालक प्रशांत कुमार म्हणाले की, कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या संगोपनासाठी त्यांना अनेक योजनांशी जोडले जाणार आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना बिहार सरकार दरमहा १ हजार ५०० रुपये देणार आहे. या अल्पवयीन मुलांना आयुष्मान कार्ड देण्यात येणार आहे. हे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या योजनेशी जोडले जात आहे. यामध्ये दरवर्षी २० हजार रुपये दिले जाणार आहेत. तसेच शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आठ हजार रुपये दिले जाणार आहेत.

Exit mobile version