ममता, सुवेंदूची आज परिक्षा

ममता, सुवेंदूची आज परिक्षा

गुरूवार १ एप्रिल रोजी आसाम आणि बंगालमधील मतदानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. बंगालमधील तीस विधानसभा क्षेत्रात मतदान होणार आहे. तिथले अंदाजे ७५ लाख मतदार हे १९१ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. तर आसाम मध्ये ३९ जागांसाठी आसामी मतदार आपला कौल देणार आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकांना मतदानासाठी आवाहन केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून मोदी आणि शहांनी हे आवाहन केले आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे, “मी बंगालमध्ये जिथे निवडणूका होत आहेत त्या भागातील नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांनी विक्रमी मतदान करावे.”

हे ही वाचा:

पीपीएफ वरील व्याजदरात बदल नाही

तर आसामच्या नागरिकांनाही मोदींनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन लोकशाहीला बळकटी देण्याची विनंती केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तुमचे “एक मत बंगालमध्ये परिवर्तन आणू शकते” असे म्हणत बंगाली मतदारांना आवाहन केले आहे. तर आसाममधील नागरिकांनी न चुकता मतदानाचा हक्क बजावा असे शहा यांनी म्हटले आहे.

ममता की सुवेंदू? जनता करणार फैसला

पश्चिम बंगालच्या निवडणूकांमध्ये आज होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानात नंदीग्राम येथे मतदान होणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरूद्ध सुवेंदू अधिकारी असा हा सामना असणार आहे. सुवेंदू अधिकारी हे एकेकाळचे ममता यांचे सहकारी होते. पण या विधानसभा निवडणूकीपूर्वी त्यांनी भारतीय जनति पार्टीत प्रवेश केला. सुवेंदू यांच्या अधिकारी कुटूंबाचा नंदिग्राममध्ये प्रचंड दबदबा आहे. गेल्या निवडणुकांमध्येही सुवेंदू यांना तिथल्या मतदारांनी नावडून दिले होते. पण आता सुवेंदू यांच्यासमोर स्वतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मैदानात उतरल्या आहेत. त्यामुळे या सामन्याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. गुरूवारी सकाळीच बाईक वरून मतदानकेंद्रावर जात. सुवेंदू यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला.

बंगाल आणि आसाम या दोन्ही ठिकाणी सकाळपासूनच नागरिकांनी मतदानाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मतदानाच्या पहिल्या टप्प्याप्रमाणेच या टप्प्यातही रेकाॅर्ड ब्रेक मतदान होण्याची शक्यता आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात आसाममध्ये ७६% तर बंगालमध्ये ८२% च्या जवळपास मतदान झाले आहे.

Exit mobile version