पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी मेट्रोसह विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनासाठी पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्याच दौऱ्यादरम्यान एमआयटी महाविद्यालयात झालेल्या सोहळ्यात भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.
पंतप्रधान मोदींनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केले आणि त्यांनी तिकीट काढून मेट्रोतून गरवारे स्टेशन ते आनंद नगर स्टेशनपर्यंतचा प्रवासही केला. देशाचे पंतप्रधान असूनही त्यांनी तिकीट काढून प्रवास केल्यामुळे फडणवीसांनी त्यांचे कौतुक केले. पुण्यामध्ये जी काही विकासकामे सुरु आहेत यामध्ये पंतप्रधानांचा वाटा मोलाचा आहे. पुण्यासाठी आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. आज पुण्याची आपली स्वत:ची मेट्रो धावली आहे. असे फडणवीस यांनी सांगितले आहे.
महामेट्रोने विक्रमी वेळेत पुणे मेट्रोचे काम पूर्ण केले त्यामुळे फडणवीसांनी महामेट्रोचे कौतुक केले आहे. तसेच पुण्याच्या गंगेला पवित्र करण्यासाठी केंद्राने जायकाचा जो प्रकल्प मंजूर करुन दिला, त्याचं उद्घाटनही आज होणार आहे. त्यामुळे पुण्याची पवित्र आणि स्वच्छ अशी नदी पाहायला मिळणार आहे, असे सांगत फडणवीसांनी पंतप्रधान मोदींचे पुन्हा एकदा आभार मानले.
त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचेही फडणवीसांनी आभार मानले आहेत. आज मोदींच्या हस्ते इलेक्ट्रिक बसेसचही लोकार्पण करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या परिवहन विभागावर विश्वास असल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींनी मेट्रो प्रवासात दिव्यांग तरुणांशी मारल्या गप्पा
पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे केले अनावरण
‘दिशा, सुशांत प्रकरणाबद्दल बोलू नका सांगायला मुख्यमंत्र्यांचा दोन वेळा फोन’
बीएसएफ जवानाच्या अंदाधुंद गोळीबारात सहा जवान ठार
तसेच मेट्रोच्या उद्घाटनाननंतर पंतप्रधान मोदींनी मोबाईलवर तिकीट काढून गरवारे स्टेशन ते आनंद नगर स्टेशनपर्यंतचा प्रवास केला. मात्र यावेळी आपण कोणी तिकीट न काढल्याची कबुली देत फडणवीसांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना त्यांचेही तिकीट घेण्याची विनंती केली.